देवरीः- (कन्हैया क्षीरसागर) ग्राम पंचायत ढीवरीनटोला अंर्तगत महाजनटोला येथे जल जिवन मिशन अंर्तगत नळ कनेक्शन ची कामे करण्यात आले असून ते कमे अजुनही अर्धवट अवस्थेत आहेत .
वृत्त सविस्तर असे की मागिल डिसेंबर महिन्यामध्ये सदर कामे कंत्राटदारांकडून कामाला सुरुवात करण्यात आले होते.पण ते काम 8 महिने लोटूनही आतापर्यंत काम पूर्ण झालेले नाही व ते काम अजूनही बंद आहे.
वार्ड 2 येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावा लागत असून तेथील ग्रामीण जनतेमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून पावसाचे दिवस सुरू आहे पिण्याच्या पाण्यासाठी जायचं तर कुठे असे प्रश्न चिन्ह निर्माण होत असल्याचे दिसत आहे .सदर काम पूर्ण करून घेण्यासाठी ढीवरीनटोला गावातील सरपंच दिलीप जुळा यांनी फोन करून ठेकेदारांसी व अधिकाऱ्यास काम पूर्ण करण्यास वारंवार विनंती केली परंतु ते याकडे दुर्लक्ष करत आहेत. व वुळवा वुळवी चे उत्तर देऊन आपली चुप्पी साधत आहेत. प्रतिक्रिया – दिलीप जुळा (सरपंच )
जल जीवन मिशन अंतर्गत नळ लावण्याचे काम ठेकेदारनी डिसेंबर महिन्यामध्ये सुरू केले परंतु महिण्याला फक्त 8 ते 10 करायचे असे करता 8 महिने लोटूनही काम पूर्ण झाले नाही. ठेकेदारास व अधिकाऱ्यास काम पूर्ण करण्यास सांगितले तर ते यावर उडवा उडवी उत्तर देऊन दुर्लक्ष करत आहे. उपसरपंच
शासकीय निधीतून ग्राम.प.लेवलवर आलेली कंत्रांटी कामे ग्राम.प. बॉडीच्या निदर्षनात झालेली पाहीजे . परंतु कंट्राटदार आम्हाला कोणतीही माहीती न देता ते आपल्या मनमर्जी पनाने कामे करून घेतात .त्यामुळे गावातील लोकांचा आक्रोश ग्रा.प.पदाधिकारी लोकांना सहन करावा लागतो.
