सालेकसाः- (बाजीराव तरोणे) सालेकसा आमगाव मार्गावरील पानगाव येथे राज्य महामार्गावर अतिवृष्टी आणि वाऱ्यामुळे मोठे झाड पडले असल्याने २ तास पर्यंत वाहतूक ठप्प झाली होती.
अचानक आलेल्या जोरदार पाऊस वाऱ्यामुळे रस्त्याशेजारील मोठे वृक्ष मुख्य रस्त्यावर मधोमध पडले होते. त्यामुळे दोन्हीकडील वाहतूक दुपारी २ तासापर्यंत कोडमडली होती. यामध्ये कोणतेही जीवितहानी झाली नसली तरी प्रवास्यांना त्रासाला सामोरे जावे लागले. शालेय विद्यार्थ्यांना घरी सोडून देण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली होती.
स्थानिक गावकऱ्यांनी श्रमदानातून व जेसीबीच्या सहाय्याने पडलेल्या झाडाला बाजूला केले आणि रस्ता मोकळा करण्यात आला.
महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याला जोडणारा प्रमुख मार्ग असल्याने वाहनांची लांबच लांब रांग लागली होती.
Author: Elgar Live News
Post Views: 168