सालेकसा
सालेकसाः-( बाजीराव तरोणे) सालेकसा तहसील येथे असलेले लघु पाटबंधारे उपविभागीय कार्यालय या कार्यालयातून विविध कामे केली जातात आज त्या कार्यालयाची दुरवस्था झाली असून त्यामुळे या कार्यालयाचे छत खाली पडले आहे. येथील कर्मचारी स्वतः सुरक्षित कसे राहणार? असा सवाल नागरिकांमध्ये चर्चेचा विषय आहे. आज 25 जुलै रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास सालेकसा तहसीलच्या पंचायत समिती आवारात असलेल्या लघु पाटबंधारे उपविभागीय कार्यालयात ही घटना घडली.कार्यालयातील कर्मचारी अधिकारी आपल्या कामात व्यस्त होते, सुदैवाने अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोणतीही इजा झाली नाही. कार्यालयाचे शेड टीनाचे असून त्याच्या खाली प्लाई पीओपी केली आहे. ती पीओपी व राफ्टर खाली कोसळले. या घटनेने जिल्हात खळबळ उडाली आहे.या कार्यालयात आम्ही आमच्या कामात व्यस्त होतो त्यामुळे येथे घडलेल्या घटनेचे रूपांतर मोठ्या अपघातात होऊ शकत होते.त्यामुळे या कार्यालयात काम करणे कठीण झाले आहे.या कार्यालयाची संपूर्ण इमारत जीर्ण खाक झाली आहे.
एन डी. काळे
वरिष्ठ लिपिक, लघु पाटबंधारे उपविभाग
