सालेकसाः- (बाजीराव तरोणे) सालेकसा नगरपंचायत सालेकसा हद्दीतील शारदा नगर या ठिकाणी अंदाजे सात आठ वर्षापासून पिण्याच्या पाण्यासाठी पाईपलाईन लावण्यात आली मात्र त्या पायपाला पाणीपुरवठा झाला नसल्याने स्थायी नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकती व्हावे लागते. या असुविधेला बघून भारत राष्ट्र समिती सालेकसा च्या वतीने नगर पंचायत कार्यालय येथे या विषयाला घेऊन वरिष्ठ अधिकारी अजय वाघमारे यांना निवेदन देऊन पिण्याच्या पाण्याची सोय करण्याबाबत मागणी करण्यात आली.यावेळी निवेदन देतानी सीमा बैस ,किरणताई मोरे,छाया ब्रम्हवंशी,विशाल लिल्हारे, कुंदा कथलेवार, आचल मेश्राम, मंजू कुंभरे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
Author: Elgar Live News
Post Views: 125