देवरीः- ग्रामपंचायत सिरपुरबांध मध्ये स्वतंत्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला.केंद्रशासनाचा आदेशान्वये दि.१३ ऑगष्ट आणि १४ ऑगष्ट ला “आजादी का अमृत महोत्सव”कार्यक्रमांतर्गत “हर घर तिरंगा” उपक्रम राबविण्यात आला.स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता सोहळा अंतर्गत ग्रामपंचायतच्या प्रांगणात ”पंचप्रण” शपथविधी कार्यक्रम घेण्यात आले. १५ ऑगस्ट २०२३ रोजी मंगळवारला ग्रामपंचायत प्रांगणात ”ध्वजारोहन” कार्यक्रम पार पाडण्यात आले. ग्रामपंचायत संपूर्ण परिसर ”भारत माता, की जय”, “तिरंगे झंडे की जय” च्या घोषणाने गुंजन उठले. या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांनी गीत, समूहगाण, भाषण, नृत्य व रंगारंग कार्यक्रम सादर केले. वर्ग १ली ते १० वी च्या विद्यार्थ्यीने विविध कार्यक्रम प्रर्दशित केले. या प्रसंगी ग्रामपंचायत मधील अध्यक्ष मा.नितेश भेंडारकर,(संरपच)नरेश शिवणकर(पोलिस पाटील सिरपुरबांध) मा.विनोद वरखडे(उपसंरपच)मा.योगराज शिवणकर,(ग्रा.पं.स्दस्य) मा.भिमराज टेकाम(ग्रा.पं.सदस्य)मा.इंदु मेेंढे(ग्रा.पं.स्दस्य)कला धुर्वे,(ग्रा.पं.स्दस्य)सेवतिन फुलकुवर(ग्रा.पं.स्दस्य)उषा कुमोटे (ग्रा.पं.स्दस्य) कर्मचारी व समस्त ग्रामवासी उपस्थित होते.