???? 24 रोजी सुरु झालेले उपोषण आंदोलन 25 रोजी मागे त्वरितच होणार कामाला सुरुवात
*साखरीटोला:-सालेकसा तालुक्यातील नानव्हा ते घोंशी दरम्यान वाहणाऱ्या कुवाढास नाल्यावरील पुल अधिकाऱ्याच्या दुर्लक्षतेमुळे नागरिकांनां जीव घेणा ठरत होता. वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर सुद्धा संबंधित विभागाने दक्षता घेतली नसल्याने त्रस्त होऊन सरपंच व गावकऱ्याच्या वतीने 24 आगस्ट रोजी जीर्ण पुलावरच तंबू गाडून बे-मुदत आमरण उपोषण सुरु केले होते. माजी आमदार संजय पुराम यांनी आंदोलन स्थळाला भेट देऊन समर्थन जाहीर केले होते. 25 आगस्ट रोजी सालेकसाचे तहसीलदार नरसिम्हा कोडागुर्ले, थानेदार बाबासाहेब बोरसे, व प्रधानमंत्री ग्राम सड़क योजनेचे कार्यकारी अभियंता कापगते यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन सविस्तर चर्चा करून उद्या पासूनच म्हणजे 26 आगस्ट पासुन पुलाची तात्पुरती दुरुस्ती करण्याचे काम सुरु करतो असे आश्वासन देऊन उपोषण आंदोलन मागे घेण्याची विनंती केले. तसेच मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता कापगते यांनी सदर पुलाचे नवीन बांधकामाचे अंदाजपत्रक तयार केले असुन अंदाजपत्रकिय किंमत 5 कोटी 89 लाख रुपये असुन डिसेंबर 2023 नंतर काम सुरू होण्याची शक्यता दर्शविली आहे. वरील आश्वासन मिळाल्यानंतर सरपंच गौरीशंकर बिसेन, सामाजिक कार्यकर्ता राजेश कटरे, पृथ्वीराज हरिणखेडे, दुर्गेश चव्हाण, यांना तहसीलदार कोडागुर्ले यांच्या हस्ते निंबू पाणी पाजून उपोषण मागे घेण्यात आले. उपोषणाला ग्राम पंचायतचे उपसपंच, सदस्य व गावकऱ्या कडुन मोठा प्रतिसाद मिळाला होता तसेच जवळील ग्राम पंचायत दरबळा, धानोली, बिंझली, खोलगळ, कावराबांध, बोदलबोळी येथील सरपंच व गावकऱ्यानी समर्थन व्यक्त करून ठराव दिले होते. ग्रा.पं तिरखेडीचे सरपंच प्रिया शरणागत, भाजप आदिवासी आघाडीचे प्रदेश सरचिटणिस शंकरलाल मडावी, तालुका मराठी पत्रकार संघांचे अध्यक्ष रमेश चुटे यांनी सरपंच गौरीशंकर बिसेन व गावकऱ्याच्या उपोषणाला समर्थन केले होते. उपोषण करत्यानी समस्त गावकरी समर्थकाचे आभार व्यक्त करित उपोषण यशस्वी झाले असे बोलून कार्यक्रमाची सांगता केली.
Ad debug output
The ad is displayed on the page
current post: *पुल दुरुस्ती आश्वासनांनंतर उपोषण आंदोलन तूर्तास मागे*, ID: 28774
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
The ad is displayed on the page
current post: *पुल दुरुस्ती आश्वासनांनंतर उपोषण आंदोलन तूर्तास मागे*, ID: 28774
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
आपले राशी भविष्य
नवराष्ट्र कौल
[democracy id="2"]