महा-आरोग्य शिबिरात 950 रुग्नाची तपासणी

रुग्णांना औषधीचे मोफत वितरण

साखरीटोला-:
ग्रामीण भागामध्ये अनेक रुग्ण वेळेवर आरोग्य तपासणी करत नसल्याने दुर्दैवाने विविध आजाराचा सामना करावे लागत असते. सर्वसामान्य ग्रामीण नागरिकांमध्ये आरोग्य तापासनिबद्दल जनजागृति व्हावी हा उद्देश समोर ठेऊन ग्रामपंचायत डोंगरगाव (सावली) आरोग्य विभाग डोंगरगाव, प्राथमिक आरोग्य केंद्र मुल्ला यांच्या सयुक्त विद्यमाने 25 आगस्ट रोजी ग्रामपंचायतच्या पटांगनावर महा-आरोग्य शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाच्या या स्तुत्य उपक्रमामुळे नागरिकांनी स्वयंस्फूर्त सहभाग नोंदवला होता. या शिबिरात बाल,वृद्ध, स्त्री पुरुष 950 रुग्णांनी तपासणी करून घेतले. विशेष म्हणजे यावेळी शालेय विद्यार्थ्यांसोबत गावकऱ्यानी योग व प्राणायाम करुन आरोग्या बद्दल माहिती घेतली. शिबिराचे उदघाटन गोंदिया जि.प. च्या महिला व बालकल्याण सभापती सविताताई पुराम यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख अतिथि म्हणून प.स. सदस्य वैशाली पन्धरे, सरपंच सुरेन्द्र परतेकी, अनिल नेवारे, ग्रामसेवक,डाॅ.सुजाता ताराम उपस्थित होते. तज्ञ डाक्टराच्या चमूने रुग्णांची तपासणी केले. डॉ. दिगंबर मरस्कोल्हे, डॉ. शंकर बनोटे. डॉ. लोकेश चिरवतकर, डॉ. सुमित पाल, डॉ उमेश नेताम,डॉ. येरणे, मनीषा मोहुर्ले, योगशिक्षीका तुप्पट मैडम, यानी विशेष सहकार्य केले.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: महा-आरोग्य शिबिरात 950 रुग्नाची तपासणी, ID: 28779

Ad: MM LIGHTTING (2543)





Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर