समाजातील गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार
साखरीटोला-
युवा कुणबी समाज सेवा समिती साकरीटोला ता. सालेकसाच्या वतीने 27 आगस्ट रोजी समितीचे संस्थापक अध्यक्ष भूमेश्वरभाऊ मेंढे यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समितीच्या वतीने समाजातील प्रावीण्य प्राप्त विध्यार्थी अनुक्रमे कु. लुभीनी भरत कठाणे, कु.मानसी महेश भुते, कु.प्रणाली गजेंद्र दोनोडे, कु.मोहिणी मनोज फुंडे, चि. सौरभ रमाकांत चुटे, यांचा सत्कार व गौरव करून उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आले. समितीच्या वतीने वार्षिक हिशेब नफा-तोटा, व संपूर्ण लेखा जोखा सादर करण्यात आले. समितीचे पुढील कार्य व त्यासाठीचे नियोजन करून चर्चा करण्यात आली. समितीमध्ये फेरबदल करण्याचा विचार ठेवण्यात आले होते पण समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष देवराम चुटे, सचिव पुथ्वीराज शिवणकर व कार्यकारिणी मंडळ पुढील सामूहिक विवाह कार्यक्रमापर्यंत हीच समिती कार्यरत राहील असे एकमताने ठरविण्यात आले. यावेळी समितीचे युगराम कोरे, रमेश चुटे, डॉ.हेमंत फुंडे, रमेश बोहरे, संजय दोनोडे, शयामलाल दोनोडे, देवराम चुटे, नरेश कावरे, पुथ्वीराज शिवणकर, अरविंद फुंडे, टेकचंद फुंडे, राजू काळे, रामदास हत्तींमारे, चंद्रकुमार बहेकार, पवन पाथोडे, प्रभु थेर, नीलकंठ दोनोडे, भरत कठाणे, पुरुषोत्तमजी कोरे, रमाकांत चुटे, कैलास बहेकार, महेश भुते, प्रमोद कोरे, नंदकिशोर चुटे, संतोष ब्राह्मणकर, सुरेंद्र फुंडे, चंद्रकुमार पाथोडे, गजेंद्र दोनोडे, महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. इंदूताई कोरे, सौ. टिना चुटे, सौ.मीनाक्षी चुटे, सौ.भुमेश्वरी दोनोडे, सौ.संगीताताई फुंडे, व समितीचे पदाधिकारी, सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन देवराम चुटे तर उपस्थिताचे आभार पवन पाथोडे यांनी मानले.