साखरीटोला-:
प्रेस ट्रस्ट ऑफ गोंदिया या पत्रकार संस्थेव्दारे 1 सप्टेंबर स्थापना दीनानिमित्य दरवर्षी शिक्षा, कला, कृषि, साहित्य, समाज सेवा अश्या विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या समाजसेवकांना जिला गौरव पुरस्काराने सम्मानित केले असते. त्याच अनुषंगाने यावर्षी सुद्धा स्थापना दिनी विविध क्षेत्रातील समाजसेवकांचा जिल्हा गौरव पुरस्काराने सन्मान होणार आहे. यात गोंदिया जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीचे सदस्य आमगावचे प्रसिद्ध पशु,पक्षी, व सर्प मित्र रघुनाथ भुते यांची जिला गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आले आहे. सदर स्थापना दिवस व गौरव पुरस्कार सत्कार कार्यक्रम होटल जिंजर (द गेटवे होटल) बालाघाट रोड गोंदिया येथे 1 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता होणार आहे. कार्यक्रमाचे उदघाटन संस्थेचे अध्यक्ष अपूर्व मेठी यांच्या अध्यक्षतेखाली गोंदिया/भंडाराचे खासदार सुनीलभाऊ मेंढे यांचे हस्ते होणार आहे, यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार विनोद अग्रवाल, जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, माजी मंत्री डॉ. परिणय फुके, आमदार राजेन्द्र जैन, माजी नगराध्यक्ष अशोक इंगले, अदानी पॉवर प्लांटचे पीयूष दिगावंकर यांच्या उपस्थिति मधे सत्कार मूर्ती समाजसेवकांना गौरव पुरस्कार प्रदान करून सत्कार केले जाणार आहे. प्रेस ट्रस्ट ऑफ गोंदिया पत्रकार संस्थेचा स्थापना दिवस व सत्कार समारोह कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष संतोष शर्मा, जयंत शुक्ला, सचिव रवि आर्य, कोषाध्यक्ष हिदायत शेख, सदस्य- अंकुश गुंडावार, कपिल केकत, हरिंद्र मेठी, आशीष वर्मा, प्रमोद नागनाथे, मुकेश शर्मा, आर.एच. चौबे, नरेश रहिले, जावेद खान, भरत घासले, दीपक जोशी, सौ. अर्चना गिरी, आर.व्ही. जोशी, बिरला गणवीर, योगेश राऊत परिश्रम घेत आहेत.