????सालेकसा पोलिसांची कार्यवाही
17 लाख 60 हजार रुपयांचा मुददेमाल जप्त
साखरीटोला-: पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांचे निर्देश व मार्गदर्शनाखाली अवैध धंदयाविरुध्द धाड मोहीम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने सालेकसा पोलीसांची अवैध धंदयाविरुध्द विशेष धाड मोहिम सुरु असून 2 आगस्ट रोजी सालेकसाचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांना मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे पोलीसांनी गस्तीदरम्यान अवैध जनावरें वाहतूक संदर्भात कारवाई केली. मौजा पांढरवानी (बिजेपार) ते डोमाटोला जंगल परिसरातील ठाकुरटोला गावातील रस्त्यावर एक ट्रक (आयसर) क्र.एम.एच- 40 सी.एम. 4034 डोमाटोला कडुन पांढरवानी (बिजेपार) कडे जातांना दिसून आल्याने सदर ट्रकला थांबविन्याचा प्रयत्न केला असता सदर ट्रक ड्रायव्हरने ठाकुरटोला गावातील रस्त्यावर ट्रक थांबवून स्वतः जंगलात पळ काढला. पोलिसांनी पाठलाग केला पण ट्रक ड्रायवर हाती लागला नाही. सदर ट्रकचे मागील डाल्याची पाहणी केली असता ट्रक मध्ये लहान- मोठे गोवंश जातीचे एकूण 26 जनावरे दोरीने दाटी वाटीने बांधुन डांबून ठेवून होते. जनावरांना चा-या पाण्याची सोय न करता निर्दयतेने बांधुन ठेवलेले गोवंश जातीचे 26 जनावरे किंमत अंदाजे 2 लाख 60 हजार रुपये, व ट्रक (आयसर) किंमत अंदाजे 15 लाख रुपये असा एकुण 17 लाख 60 हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आले. पो.ठाणे सालेकसा येथे अज्ञात इसमाविरुध्द कलम 11 (1) (ड) (इ), (फ) (ह) महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा, सहकलम 5 (अ) (2),9 महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1960 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध घेणे सुरु आहे. सदर गुन्हयाचा तपास म.पो.उप.नि. मयुरी नागदिवे हे करित आहेत. सदर गुन्हयात जप्त गोवंश जातीचे जनावरांना त्यांचे सुरक्षेच्या दृष्टीने लक्ष्मी गौशाला चॅरीटेबल ट्रस्ट चुटीया ता. जि. गोंदिया येथील गौशालेत दाखल करण्यात आले आहे. सालेकसाचे ठाणेदार बाबासाहेब बोरसे, म.पो. उप.नि. मयुरी नागदिवे, पोशि.अजय इंगळे,विकास वेदक, पो.स्टे. सालेकसा यांनी कामगिरी बजावली.