श्रेय लाटण्यासाठी आमदार कोरोटेनीं केले अर्धवट कामांचे लोकार्पण


????पांढरंवाणी उपसा सिंचन योजनेचे 75 टक्के काम अपूर्ण.
????शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवून कोरोटे मुर्दाबादचे लावले नारे
????अर्धवट कामाचे लोकार्पण करून श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न
गोंदिया-: सालेकसा तालुक्यातील पांढरंवाणी या आदिवासी गावात पांढरवाणी उपसा सिंचन योजनेचे काम अनेक वर्षांपासून सुरु आहे. सदर योजनेचे 75 टक्के कामे बाकी असून फक्त 25 टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र क्षेत्रातील कांग्रेस पक्षाचे आमदार सहसराम कोरोटे यांनी श्रेय लाटण्याच्या नांदात 4 सप्टेंबर रोजी अर्धवट कामाचे लोकार्पण उरकून टाकले. दरम्यान गावातील शेतकऱ्यानी आक्रमक पवित्रा घेत काळे झंडे दाखवून कोरोटे मुर्दाबादचे नारे लावून विरोध दर्शवीला होता. यामुळे लोकार्पणाच्या लगीनघाईला ब्रेक लागणार व काम पूर्ण होणार कि नाही असा प्रश्न शेतकऱ्यानी उपस्थित केला आहे. भाजप-सेनायुतीच्या कालखंडात सदर उपसा सिंचन योजनेला मंजुरी मिळाली होती. कालिसरार सिंचन प्रकल्पातुन पाण्याचा उपसा करून आदिवासी बहुल व नक्षल प्रभावित पांढरंवाणी या आदिवासी गावातील शेतजमीनी सिंचनाखाली आणण्याच्या मुळ उद्देश असलेल्या पांढरंवाणी उपसा सिंचन योजनेचे 75 टक्के काम अद्यापही पूर्ण झाले नसतांना आमदार सहसराम कोरोटे यांनी अपूर्ण असलेल्या योजनेचे घाईगर्दीत लोकार्पण करून श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला होता. लोकार्पण कार्यक्रमाची पूर्व सूचना किंवा माहिती स्थानिक ग्रामपंचायत व योजनेच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्याना सुद्धा नव्हती. लोकार्पणाचे दिवशी म्हणजे 4 सप्टेंबर रोजी सकाळीच लोकार्पण कार्यक्रमाची पत्रिका मिळाल्यावर शेतकऱ्यांना आज लोकार्पण होत असल्याचे कळले हे विशेष. कामे अपूर्ण असून लाभ क्षेत्रातील 75 टक्के शेतीला पाणी उपलब्ध होत नाही असे असतांना आपल्या कार्यकर्त्यांची फौंज घेऊन आमदारांनी कसे काय लोकार्पण उरकवून टाकले या संदर्भात शेतकरी अवाक झाले झाले असून आदिवासी शेतकरी कार्यक्रमाचा विरोध दर्शविण्यासाठी एकत्रित आले पण आमदाराने घाईगर्दीत लोकार्पण उरकवून टाकले होते. लाभधारक क्षेत्रातील संपूर्ण शेतकऱ्यांना जोपर्यंत सिंचनाचा लाभ मिळत नाही. तोपर्यंत लोकार्पण करण्याचे प्रश्नच उद्भवत नाही असे मत शेतकऱ्यांनीं व्यक्त केले.
श्रेय लाटून चर्चेत राहण्यासाठी कोरोटेचा केविलवाणा प्रकार
सालेकसा तालुक्यातील भजेपार ते बोदलबोडी- सालेकसा मार्गाला जोडणाऱ्या वाघ नदीवर पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन तत्कालीन आमदार संजय पुराम यांनी केले होते. निवडणुकीत तत्कालीन आमदार संजय पुराम पराभूत झाले असता वर्तमान आमदार सहसराम कोरोटे यांनी श्रेय घेण्याचे नादात भजेपार- बोदलबोडी वाघ नदीवरील पुल बांधकामाचे पुन्हा भूमिपूजन केले होते. दुसऱ्यादा भूमिपूजन करून श्रेय घेतला मात्र बांधकामाला अजून पर्यंत सुरुवात झाली नाही. आणि निवडणूक येऊन ठेपली आहे.
अर्धवट काम झालेल्या ग्रामीण रुग्णालयाचे लोकार्पण*
सन 2014 ते 2019 दरम्यान तत्कालीन आमदार संजय पुराम यांनी केले. देवरी येथील ग्रामीण रुग्णालयांच्या नवीन इमारतीसाठी 12 कोटी 50 लक्ष रुपये मंजूर करून ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरु केले होते. काम अजून पर्यंत सुरूच आहे मात्र आमदार सहसराम कोरोटे यांनी लगीनघाई दाखवत कामे सुरु असलेल्या ग्रामीण रुग्णालय इमारतीचे लोकार्पण करून टाकले आहे. हा श्रेय घेण्याचा प्रकार नाही तर काय आहे?.
*स्वतः आमदार असतांना रस्ता दुरुस्तीसाठी काढली दिंडी यात्रा*
साखरीटोला ते तिरखेडी या सात किलोमीटरच्या रस्त्यावर
जागोजागी जीवघेणी खड्डे पडले असून शेष रस्त्याची चाळन झाली आहे. त्यामुळे सायकल, दुचाकी व चारचाकी वाहन चालकांना जीव मुठीत ठेऊन तारेवरची कसरत करत प्रवास करावे असते आमदारांला वास्तविक विकास कामाची जिद्द असती तर आपल्या स्थानिक विकास निधीतून तात्पुरती दुरुस्तीचे काम करून घेऊ शकत होते. मात्र आमदार सहसराम कोरोटे यांनी रस्ता दुर्लक्ष करित चर्चेत राहण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांनां सोबत घेऊन सातगाव ते तिरखेडी मार्गावर भजन दिंडी यात्रा काढले होते हे उल्लेखनीय आहे.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: श्रेय लाटण्यासाठी आमदार कोरोटेनीं केले अर्धवट कामांचे लोकार्पण, ID: 28865

Ad: MM LIGHTTING (2543)





Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर