कन्हैया क्षीरसागरः- फुक्किमेटा/देवरी: एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय देवरी या मार्फत आदिवासी लाभार्थ्यांना एनिमल डिव्हाईस (पोंगा) 09/09/2023 ला वाटप चे कार्यक्रम करण्यात आले. या कार्यक्रमात सामूहिक वन हक्क व्यवस्थापन समिती फुक्किमेटा ग्रामसभा महासंघ तालुका देवरी सदर कार्यक्रमामध्ये उपस्थित होते. सदर कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालय फुक्किमेटा येथे 11.30 वाजता घेण्यात आले. या कार्यक्रमामध्ये उपस्थित चिंतामणी गंगाबोइर उपसरपंच , सूरज सराटे वनहक्क समिती अध्यक्ष, धनु बहेकार वनहक्क समिती सचिव,मेघनाथ बहेकार, त्याचप्रमाणे गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी समितीचे अध्यक्ष सराटे यांनी आदिवासी बांधवांना संबोधित करतेवेळी सांगितले की आपल्याला मिळालेला एनिमल डिव्हाईस (पोंगा) खूप विशिष्ट ठरणार आहे. या डिव्हाईस पासून तुमच्या शेतीचे रक्षण करेल या डिव्हाईस मध्ये सेन्सर लागलेला आहे.जर कुणी वण्यप्राणी या समोर आला तर तो पोंगा आवाज करत असतो त्यामुळे तुमचे शेताचे राखणं करण्यासाठी योग्य आहे.




