साखरीटोला-: (रमेश चुटे)
कार्यकर्त्यांनी आपसातले मतभेद बाजूला ठेऊन पक्षासाठी एकजुटीने काम केले तर
सालेकसा तालुका हा भारतीय जनता पार्टीचा मजबूत बालेकिल्लाच आहे असे उदगार गोंदिया जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष ऍड. येसूलाल उपराडे यांनी व्यक्त केले ते सालेकसा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित मेरा बूथ सबसे मजबूत या कार्यक्रमात बोलत होते. 09 सप्टेंबर रोजी सालेकसा येथील भात गिरणीच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाचे उदघाटन भाजपचे जिल्हाध्यक्ष ऍड.येसूलाल उपराडे यांच्या अध्यक्षतेखाली माजी आमदार व भाजपचे प्रदेश सचिव संजय पुराम यांच्या हस्ते करण्यात आले. सर्वप्रथम माजी विदर्भ संघटन मंत्री स्व. अरविंदजी शहापूरकर यांना 2 मिनिटाचे मौन धारण करून श्रद्धांजली वाहन्यात आले. समस्त कार्यकर्त्यांनी महाविजय 2024च्या तयारीसाठी बूथ स्थरावरून कार्य करावे व मेरा बूथ सबसे मजबूत हे ध्येय साध्य करावे असे आव्हान माजी आमदार संजय पुराम सह मंचावर उपस्थित अतिथीनीं केले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश भाजप आदिवासी आघाडीचे सचिव शंकरलाल मडावी, तालुका अध्यक्ष गुणवंत बिसेन, जिल्हा ओबीसी आघाडीचे महामंत्री परशराम फुंडे, पंचायत समिती सद्स्य गुमानसिंग उपराडे, प.स. सदस्या अर्चनाताई मडावी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाप्रसंगी भाजपचे सर्व आघाडीचे पदाधिकारी बूथ प्रमुख, सरपंच, महामंत्री, पार्टीचे विस्तारक, शक्तीकेंद्र प्रमुख, वरिष्ठ व कनिष्ठ कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
