????गोंदिया येथील कुणबी जन आक्रोश सभा, व ओबीसी जन आक्रोश महाआंदोलना यशस्वी करण्यासाठी युवा कुणबी समाज सेवा समिती साखरीटोलाने घेतली सभा
????मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने कुणबी संघटना आक्रामक
साखरीटोला-: (रमेश चुटे) मराठा आरक्षणाला घेऊन सध्या महाराष्ट्रात वातावरण तापलेलं आहे. यातच आता कुणबी समाजाने आक्रमक पवित्रा घेतला असून आपल्या संवैधानिक हक्क आणि अधिकारावरील इतरांचे अतिक्रमण खपवून घेणार नाही, शासनाने मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचा विचारही करू नये, यासाठी जागोजागी कुणबी समाज एकत्रित होत आहे. या संदर्भात आक्रोश आंदोलनाची पूर्व तय्यारी करिता 13 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत सातगावच्या सभागृहात साखरीटोला येथील युवा कुणबी समाज सेवा समितीने सभा घेतले असून

16 सप्टेंबर रोजी गोंदिया जिल्हा कुणबी समाज संघर्ष कृती समितीच्या वतीने आयोजित कुणबी जनआक्रोश सभा, आणि 18 सप्टेंबर रोजी ओबीसी जनआक्रोश महाआंदोलनात जास्तीत संख्येने उपस्थित होण्यासाठी सविस्तर चर्चा करून पदाधिकाऱ्यांना जवाबदारी नेमण्यात आले आहे.

ओबीसी प्रवर्गात 350च्या वर जातीचा समावेश आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही कुणबी व समस्त ओबीसी समाज विकासाच्या मुख्य प्रवाहात आला नाही. आता यात राजकीय व आर्थिक क्षेत्रात प्रबळ असलेल्या मराठा समाजाची भर पडल्यास ओबीसी समाजाला परवडण्यासारखे नाही. मराठा आरक्षणाला विरोध नाही त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या यात ओबीसी आरक्षणाला डिवचू नये अशी मागणी आहे. अन्यथा कुणबी व ओबीसी समाज रस्त्यावर उतरून महाआंदोलन उभारेल दरम्यान कायदा व सुव्यवस्था बाधित झाल्यास सर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्र शासनाची राहील असा झणझणीत इशारा असलेला निवेदन सोमवार, दिनांक 11 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रीयन कुणबी महासंघ गोंदिया, युवा कुणबी समाज सेवा समिती साकरीटोला, झाडे कुणबी समाज संघटनेच्या प्रतिनिधीनी गोंदियाचे जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे. मराठा आरक्षणाला घेऊन कुणबी व संपूर्ण ओबीसी समाजात प्रचंड आक्रोश खदखदत असून वरील आंदोलनाला यशस्वी करण्यासाठी युवा कुणबी समाज सेवा समिती साकरीटोला तर्फ आयोजन करण्यात आले होते. बैठकीत समितीचे प्रभाकर दोनोडे, रमेश चुटे, कमलबापू बहेकार, युगराम कोरे, नरेश कावरे, डाँ. संजय देशमुख, संतोष बोहरे, संजय दोनोंडे, चंद्रकुमार बहेकार, राजू काळे, देवराज खोटेले, प्रेमभाऊ कोरे, पुर्थ्वीराज शिवणकर, राजेश दोनोंडे, मोहन दोनोंडे, ओमप्रकाश दोनोंडे, शेलेंद्र बहेकार, प्रल्हाद मेंढे, अजयाताई चुटे उपस्थित होते.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: , ID: 28913

Ad: MM LIGHTTING (2543)





Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर