????माजी आमदार पुराम यांच्या प्रयत्नाला यश, लवकरच ना. विजयकुमार गावित यांच्या हस्ते होणार भूमिपूजन
साखरीटोला:- (रमेश चुटे) सालेकसा तालुक्यातील आदिवासी बांधवाचे पवित्र श्रद्धास्थान असलेल्या तीर्थक्षेत्र कचारगडच्या विविध विकासासाठी आमगाव/देवरी क्षेत्राचे माजी आमदार संजय पुराम यांचे मागणीनुसार निधी मंजूर करण्यात आले आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री ना. डाँ. विजयकुमार गावित यांचे हस्ते भूमिपूजन व्हावे या संदर्भात संजय पुराम यांनी ना. गावित यांना आग्रहाचे निमंत्रण देऊन सविस्तर चर्चा केले असता भूमिपूजनाची तारीख लवकरच ठरवून काही दिवसातच कळवतो असे आस्वासन मिळाले असल्याने राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित सालेकसा तालुक्यातील कचारगड येथे भूमिपूजन कार्यक्रमात येणार असल्याची माहिती आहे. सालेकसा तालुक्यातील अत्यंत दुर्गम व निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या कचारगढच्या यात्रेत महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छतीसगड, आंध्र प्रदेश, बिहार, ओरिसा, झारखंड, उतर प्रदेश, मिझोरम आदी राज्यातून लाखो भाविक येतात व आपल्या आराध्य दैवत म्हणजे “पारी कोपार लींगो”चे दर्शन घेऊन. आपली संस्कृती जोपासतात. याच कचारगडच्या गुफेतूनच आदिवासी समाजाचा उगम झाला, अशी आख्यायिका आहे. यात्रेत येणाऱ्या भाविकाच्या सोयी सुविधेसाठी ग्रामीण तीर्थक्षेत्र ग्रामविकास विभाग अंतर्गत विविध विकास कामांना मंजूरी मिळाली आहे. यात्रेदरम्यान कोयापुनेम अधिवेशन आयोजित करण्यात येत असून येणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने यात्रेदरम्यान होणारी अफाट गर्दीच्या सोयी सुविधे करिता विकास कामे करणे गरजेचे असल्याने सदर कामांचे भूमिपूजन लवकरच ना. गावित यांच्या हस्ते होणार आहे
