सिरपुरबांधः- ग्रामपंचायत सिरपुरबांध,ता.देवरी,जि.गोंदिया येथील पोळा हा शेतकरी वर्गातील मोठा सन मानलो जातो.शेतकरी वर्ग हा आपल्या शेतीची मशागत बैलजोडीच्या मदतीने करतो.पुर्वीच्या काळी प्रत्येक शेतकरी बांधवाकडे एक बैल जोडी राहायची पण आज वर्तमान काळात बैलजोडीचे प्रमाण भरपुर कमी झाले आहे.गावातील शेतकरी वर्ग हा यंत्राच्या साह्याने शेती करु लागल्यामुळे बैलजोडीचे महत्व कमी झाले आहे. शेती ही सेंद्रिय का केली पाहीजे? /यांचे कारण देशातील खाद्य पदार्थावर रासायनिक खते,ट्रक्टर चे आईल ,रासायनिक औषधीचे प्रमाण वाढल्यामुळे देशात मानवाला अनेक रोगांला बळी पडावे लागत आहे.त्यामुळे शेती ही सेंद्रिय करणे काळाची गरज आहे.बैलजो़डी मुळे शेती ही नैसर्गिक होईल यासाठी बैलजोडीचे प्रमाण वाढले पाहीजे असे मत गावातील प्रतिष्ठित नागरीकांचे आहे. गावातील पोळा हा सन आनंदात व व्यवस्थित पार पाडण्यासाठी गावातील पोलिस पाटील,संरपच,पदाधिकारी,युवा वर्गानी मदत केली.