देवरीः- (कृष्णा ब्राम्हणकर) दि.१६/०९/२०२३ रोज शनिवार ला गोंदिया येथे संपुर्ण जिल्ह्यातुन कुनबी समाज हा आपल्या अधिकारासाठी रस्त्यावर उतरत आहे.कुनबी समाज हा महाराष्ट्रात 43 टक्के असुन ह्या समाजाला आता पर्यंत त्यांचे सांविधानिक अधिकार मिळाले नसुन सरकार ही जाती निहाय जनगन्ना करण्यासाठी ओबीसी समाज संर्घष करतो आहे.तरी सरकार आता पर्यंत जनगन्ना करित नाही. कुनबी समाज हा सर्वात मोठ्या लोकसंख्याने असुन शासन ह्या समाजाला सांविधानिक अधिकार देत नसुन ह्या समाजातील वाटा त्याच समाजाला भेटत नसतांनी सरकार कुनबी समाजाचा वाटा पुर्ण न करता त्यांचे अवहेलना करुन ज्या समाजाची टक्केवरी सर्वात कमी असुन शुध्दा त्या समाजाला सरसकट कुनबी प्रमाणपत्र देवुन कुनबी समाजावर अन्याय करित आहे. हा अन्याय कुनबी समाज सहन करणार नाही.आपल्या मुला- मुलींना सांविधानिक अधिकार मिळावे म्हणुन सर्व जिल्ह्यातील कुनबी बांधवानी जास्तीत जास्त संख्येने जन आक्रोश मोर्च्यामध्ये ठिक १०.०० वाजे सहभागी व्हावे.
- राम गायधने (अध्यक्ष)
- कुणबी समाज सेवा संस्था,देवरी