कुणबी समाजाचा उपविभागीय कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा
गोंदियाः- जिल्हा कुनबी समाज संर्घष कृती समितीतर्फे गोंदिया येथील पवार बोर्डीग सभागृहात कुनबी समाज जन आक्रोश जागर सभेचे आयोजन करण्यात आले होते.जनआक्रोश सभा ही संविधान चौकात आयोजित केली होती पण पाऊसामुळे पवार बोर्डीग हाल मध्ये ठेवण्यात आली.या ठिकाणी मंचावर हे विविध कुनबी संघटनेचे पदाधिकीरी उपस्थित होते.आपल्या बोलण्यातुन कुनबी समाजाचा प्रतिनिधित्व त्यांच्या लोकसंख्यानुसार त्यांना भेटत नाही व सरकार ते पुर्ण न करता सरसकट मराठा समाजाला कुनबी प्रमाणपत्र देण्याचे ठरविते आहे.ते कुनबी समाज शहन करुन शकणार नाही.म्हणुन मराठा समाजाला कुनबी प्रमाणपत्र देवु नये अशी भुमिका कुनबी (ओबीसी) संघटनेने घेतली आहे. जिल्हा परिषदेचे कृषी पशुसंवर्धन सभापती सोनु कुथे हे आपल्या भाषणातुन म्हणाले की ओबीसी युवकांना ओबीसी काय आहे हे माहीत नाही.ओबीसी वर्ग हा जाती मध्ये विभागला गेल्यामुळे ओबीसी काय आहे यांची जाणिव ओबीसींना नाही त्यामुळे ग्रामीण भागात जावुन ओबीसीच्या लोकांना ओबीसीच्या सांविधानिक अधिकाराची जाणीव करुन ओबीसी 55 टक्के लोकसंख्या असलेल्या समाजाला प्रत्येक ठिकाणी प्रतिनिधित्व मिळावे असे सांगितले. दरम्यान जनआक्रोश रेैली काढुन संत तुकाराम महाराज यांना माल्यापर्ण करुन संविधान चौकात येवुन परमपुज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना माल्यापर्ण करुन मा.तहसिलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. मंचावर माजी पालक मंत्री डाँ. परिणय फुके, माजी खासदार मधुकर कुकडे, माजी आमदार-रमेश कुथे, भंडारा जिल्हा बॅकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, माजी जि.प.अध्यक्ष -विजय शिवणकर, जिल्हा परिषदेचे कृषी पशुसंवर्धन सभापती सोनु कुथे, अमर व-हाडे, प्रेमलाल कढव, प्रभाकर दोनोडे, गजेंद्र फुंडे, दुलिचंद बुध्दे, चंद्रप्रकाश चुटे, देवराम चुटे, कमलबापु बहेकार, काशिराम हुकरे, श्रीराम गायधने उपस्थित होते. कुणबी समाज जन आक्रोश सभेत साखरीटोला, सालेकसा, आमगाव, देवरी, गोरेगाव, तिरोडा, सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव, सौदंड, गोंदिया व संपुर्ण जिल्ह्यातील कुनबी समाज संघटनाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.