देवरीः- दि.१७/०८/२०२३ ला जि.प.शाळा देवरी येथे अंधश्रध्दा निर्मुलन समिती तथा शिक्षक एकता मंच तालुका देवरी जिल्हा गोंदिया व्दारा आयोजित .या कार्यक्रमामध्ये समग्र महापुरुषांच्या वैचारिक क्रांतीतुन प्रेरणा घेवुन स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी व युवकांमध्ये स्पर्धा परिक्षेची माहीती व जाणिव जागृती व्हावी या उदात्त हेतुने वर्तमान काळातील सध्याची स्थिती आणि भविष्यातील आव्हाने या विषयावर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व करियर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी अधिकारी साहेब आले होते.या कार्यक्रमाचे मार्गदर्शन करतांनी मा.रविकुमार कराडे साहेब (स्टेट टॅक्स इन्सपेक्टर महाराष्ट्र शासन) यांनी विद्यार्थी जिवनात आपल्याला स्वतःचा आत्मविश्वास असणे आवश्यक आहे.स्पर्धा परिक्षा मध्ये वर्ग ६ पासुन संपुर्ण अभ्यास क्रम असतो त्यासाठी सुरुवातीपासुन अभ्यास व्यवस्थित करणे आवश्यक आहे.मा.डॉ.रुपेश राऊत साहेब (जिल्हा सांख्यिकी अधिकारी,जिल्हा गोंदिया) यांनी विद्यार्थी हा ग्रॅज्युशन होणेच म्हणजे सरकारी नौकरी लागणे नाही.वर्ग 7 पासुन शुध्दा केंद्रशासनाच्या खात्यामध्ये स्पर्धा परिक्षा देवुन नौकरीच्या संधी आहेत.त्या सामान्य न झाल्यामुळे ग्रामीण युवकांना माहीती नाही.त्या वर्तमान पत्रात जाहीराती येत नाही.त्या वेब साईड वर मिळतात.मा.संदिपजी बडोले साहेब(किंग्ज कॉलेज,लंडन(इंग्लड) विद्यार्थ्याना मार्गदर्शन करतांनी (IELTS exam for Foreign EducationIELTS चे पूर्ण रूप आंतरराष्ट्रीय इंग्रजी भाषा चाचणी प्रणाली आहे. ही जगातील सर्वात लोकप्रिय इंग्रजी भाषेची चाचणी आहे. येथे परदेशात अभ्यास करण्यासाठी तसेच नोकरी आणि स्थलांतरासाठी उपयुक्त आहे. १० हजारांहून अधिक संस्था या परीक्षेला मान्यता देतात. ही चाचणी उत्तीर्ण केल्याने तुम्हाला इंग्रजीवर पूर्ण प्रभुत्व असल्याचे दिसून येते. )या प्रकारे आपण विदेशात शिक्षण घेवु शकता)मा.धनजंय वंजारी साहेब(IRS)एडिशनल कमिशनर इन्कम टॅक्स,नागपुर) यांनी आपल्या परिस्थितीवर मात करुन जिद्दीने अभ्यास करणे कोण काय म्हणतो या कडे लक्ष न ठेवता आपल्या ध्येयाकडे लक्ष ठवले पाहीजे.समाजात आपण जे पाहतो तेवढाच विचार आपल्या मनात येतो त्या पलीकडे आपण विचार करत नाही.आपल्या सभोवताल तलाटी,शिक्षक,नर्स,ग्रामसेवक,पोलिस हेच दिसत असल्यामुळे आपण त्यापलिकडे आपली नजर जात नाही.त्यामुळे आपण तेथेच थांबतो.आपण मोठे ध्येय ठेवले पाहीजे.जग भरपुर मोठ आहे.ग्रामीण भागातील मुलांना पण संधीआहेत.आपण विनाकारण वेळ मोबाईल वर न घालवता तो ज्ञानार्जनाकडे वापरला पाहीजे व आपले जिवन स्वतःसाठी व समाजासाठी दिले पाहीजे कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.के.सी.शहारे शर,(से.नी.प्राचार्य म.भा.प.क.महा.देवरी) मा.श्री.मंगलमुर्ती सयाम सर(आर्दश शिक्षक)मुख्याध्यापक जि.प.हाय देवरी) प्रमुख मार्गदर्शक मा.रविकुमार कराडे साहेब (स्टेट टॅक्स इन्सपेक्टर महाराष्ट्र शासन),मा.डॉ.रुपेश राऊत साहेब (जिल्हा सांख्यिकी अधिकारी,जिल्हा गोंदिया)मा.संदिपजी बडोले साहेब(किंग्ज कॉलेज,लंडन(इंग्लड)मा.धनजंय वंजारी साहेब(IRS)एडिशनल कमिशनर इन्कम टॅक्स,नागपुर) सुत्रसंचालन वाघाडे सरांनी केले व आभार प्रदर्शन दामले सर यांनी केले.