लोहाराः- (कन्हैया क्षीरसागर) देवरी आमगाव मुख्य रस्त्यावरील ग्राम लोहारा येथे आज दि.18 सप्टे. ला झालेल्या बस आणि दुचाकीचा धडकेत एक जागीच ठार तर एक गंभीर झाल्याची घटना घडली आहे.
सूत्रानुसार,दुचाकीधारक नामे,शैलेश मदन मरसकोल्हे वय 35 रा.कारूटोला/पुराडा हे आपली दुचाकी क्र.MH 35 AN 5016 घेवून देवरी मार्ग जात असताना,समोरून येणारी महामंडळाची एसटी बस क्रमांक MH07 C9307 येथील चालकाचा बस वरून ताबा सुटून दुचाकीला धडक दिली.धडक एवढी जबरदस्त होती की,दुचाकीवरील एक जागीच ठार झाला.तर एक गंभीर जखमी झाला.जखमीला ग्रामीण रुग्णालय देवरी येथे हलविण्यात आले.
पुढील तपास पोलीस स्टेशन देवरी येथील हवालदार गुणवंत कठाने करीत आहे.
Author: Elgar Live News
Post Views: 319