साखरीटोला-: प्रतिवर्षानुसार यावर्षी सुद्धा श्रीगणेश उत्सव थाटामाटात साजरा करण्यासाठी साखरीटोला/ सातगाव तालुका सालेकसा येथे सार्वजनिक नवयुवक गणेश उत्सव मंडळ गठीत करण्यात आले आहे. यात अध्यक्षपदी गगन छाबडा तर सचिव पदी अंकित मिश्रा, यांची निवड करण्यात आले. कार्यकारिणी मंडळात मनीष देवकते, कमलेश अग्रवाल, यथार्थ बोहरे, आकाश बावनकर, अजय गजभिये, प्रद्युम मुनेश्वर, शंकर ठाकरे, मनोज गजभिये, प्रकाश फाफनवाडे, तुषार बघेले, संगम ऊईके, चंदन मेहर, यश अग्रवाल यांचा समावेश आहे. श्रीगणेशच्या स्थापनेपासून सतत विविध कार्यक्रम घेतले जाणार आहेत. पर्यावरणपूरक मूर्ती स्थापित केले असून उत्कृष्ट सजावट, प्रदुषणविरहीत वातावरण असणार आहे. पूर्ण नवदिवस सामाजिक कार्य, शैक्षणिक, आरोग्य आदीसंबंधी कार्य, पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धांचे आयोजन, पारंपरिक, देशी खेळांच्या स्पर्धा, घेण्यात येणार आहेत.
![Elgar Live News](https://secure.gravatar.com/avatar/74fb4f4b083185b668967fec198f3e1b?s=96&r=g&d=https://elgarlivenews.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)