देवरीः- ग्राम सिरपुरबांध येथील चौकामध्ये ट्रकांचा जाम लागल्यामुळे गाावातील नागरिकांना जाण्यासाठी अडचण होत आहे.एन.एच.53 वर जंगलातील जनावरासाठी पुलाचे बांधकाम सुरु आहे.त्याठिकाणी जाण्या-येण्यासाठी साईड वरुन रस्ता बनविण्यात आला आहे हा रस्ता अग्रवाल ग्लोबल कंपनीने बनवितांनी ट्रकांची एका दिवशाची आवागमन किती आहे.त्यानुसार रोड तयार करायला पाहीजे पण तसं होत नाही कंपनी पैसे वाचविण्यासाठी रोड बांधकाम व्यवस्थित करीत नाही त्यामुळे गावातील विद्यार्थी, नागरिक व ट्रकचालकांना भरपुर त्रास होतो. ह्या क्षेत्रातील आमदार,जिल्हा परिषद सदस्य,ग्रामपंचायत पदाधिकारी यांचे दुर्लक्ष आहे कि काय असे संभ्रम गावातील नागरिकांना आहे. पदाधिकारी यांनी वेळीच लक्ष देवुन रोड व्यवस्थित करण्याची मागणी केली पाहीजे.त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकशान होणार नाही.