साखरीटोला-: (रमेश चुटे)
श्री सरस्वती विद्या मंदिर आमगाव द्वारा संचालित श्रीविद्या गर्ल्स हायस्कूल सातगाव (साकरीटोला) येथील इयत्ता दहावी तील विद्यार्थी शुभम तरोने व सुमित चामलाटे यांनी वयोगट 17 मध्ये जिल्हास्तरीय कुस्त्ती स्पर्धेत अव्वल स्थान प्राप्त केले आहे.
13 सप्टेंबर रोजी क्रीडा संकुल गोंदिया येथे जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा स्पर्धेत प्रथम स्थान प्राप्त करणारे विध्यार्थी सुमित चामलाटे, व शुभम तरोने यांची विभागीय कुस्ती स्पर्धेकरीता निवड झालेली आहे. मार्गदर्शक शिक्षक टी.जी.फुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करणारे सुमित व शुभम यांनी मनात असलेली जिद्द साकार करून यश संपादन केले आहे.
जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत यश मिळविल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका अजया चुटे यांचे अध्यक्षतेखाली सुमित व शुभम यांचे सत्कार करण्यात आले. यावेळी मार्गदर्शक शिक्षक टी.जी.फुंडे, एम.बी.पटले, एम.के.कोरे ,कु. एस.एस.बडोले, कु.एम. के. रहांगडाले, देवराज चींधालोरे, अशोक वर्गट्वार, अल्का वाघमारे, उपस्थित होते.
सुमित व शुभम यांनी आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शक शिक्षक श्री.टी.जी.फुंडे व शाळेच्या मुख्याध्यापिका अजया चुटे यांना दिले आहे.
Author: Elgar Live News
Post Views: 72