देवरीः- दिनांक 02/10/2023 ला देवरी जि.गोंदिया येथील भारत मुक्ती मोर्चा,बहुजन क्रांती मोर्चा,राष्ट्रीय पिछडा वर्ग(ओबीसी)मोर्चा यांच्या माध्यमातुन देवरी येथील झासी राणी दुर्गावती चौकात संपुर्ण तालुक्यातुन पदाधिकारी व गावकरी एकत्रित येवुन .सरकार ही बहुजन विरोधी कृत्य करीत आहे.१)गृहमंत्री फडणवीसाच्या आदेशावरुन मराठा आंदोलकांवर केलेल्या अमानुष लाठीहल्ला व गोळीबाराच्या विरोधात (२) महाराष्ट्र राज्याच्या ६२ हजार सरकारी शाळांचे खाजगीकरण करणा-या संविधानविरोधी व बहुजनविरोधी आएसएस/भाजपा सरकारच्या धोरणाच्या विरोधात (३)ओबीसींची जातीनिहाय जनगणना व सांविधानिक हक्क अधिकाराच्या समर्थनात(४) बहुजनांचे प्रेरणास्थळ पंढरपुरचे मंदिर बडवे ब्राम्हणांच्या स्वाधिन करण्याच्या आरएसएस/भाजपाच्या षंडयंत्राच्या विरोधात (५)बहुजन महापुरुषांंच्या,संविधान व राष्ट्र प्रतिकांचा अपमान करणा-या देशद्रोही,आंतकवादी,दंगलखोर,मनोहर भिडेला अभय देणा-या भाजप सरकारच्या विरोधात हा महाराष्ट्र बंद रॅली ही देवरी भर काढण्यात आली.भारत मुक्ती मोर्चा,बहुजन क्रांती मोर्चा,राष्ट्रीय पिछडा वर्ग(ओबीसी)मोर्चा चे वंदना डोंगरे(भारत मुक्ती मोर्चा संयोजक) करुणा नंदागवळी (भारत मुक्ती मोर्चा तालुका प्रभारी)किरण रामटेके (भारत मुक्ती मोर्चा तालुका प्रमुख)दिलीप जुडा(राष्ट्रीय आदीवासी एकता मंच)राजकुमार बंन्सोड(बिन) कैलाश वैद्य व समस्त पदाधिकारी यांनी सहकार्य केले.