फुक्किमेटा/देवरी (कन्हैया क्षिरसागर) दि.02 ला राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त ग्रामपंचायत कार्यालय व जि.प.प्रा.शाळा फुक्किमेटा येथे जयंती साजरी करण्यात आली. माहात्मा गांधी यांच्या विचाराने संपुर्ण ग्रामपंचायत स्वच्छ व समृध्द करुया हा संकल्प घेण्यात आला. याप्रसंगी उपस्थित सुलोचना सरोते सरपंच,चिंतामणी गंगाबोइर उपसरपंच, शिवदर्शन भांडारकर मा.सरपंच, रामेश्वर बहेकार मा. प. समिती सदस्य देवरी, राजकुमार नेताम ग्रा. सदस्य, सुरेखा बारसे ग्रा. सदस्य,किरण आचले सदस्य, सर्व सदस्यगण एस.पी.गायकवाड ग्रामसेवक, मेघनाथ बहेकार रो.सेवक,चंदू हुकरे पो.पा., निनावे सर मुख्याध्यापक, एल.यू.तावाडे सर मुख्याध्यापक पहाडीटोला, सर्व शिक्षकवृंद, रमाबाई भांडारकर अंगणवाडी सेविका,मनीषा पडोळे आरोग्य सेविका, लालदास सोंकलीहरी ग्राम.परिचर, सुरेश किरसान,देवराज दुधनांग व गावातील नागरिक कार्यक्रमामध्ये सहभागी होते.
