????ढोल तासाच्या गजरात शहीद वीरांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी आरती घेऊन निघाल्या महिला
साखरीटोला-: (रमेश चुटे) भारत देश आज जगात सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. देशाने अनेक क्षेत्रांत प्रगती केली आहे. मात्र देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिले. स्वातंत्र्यलढ्यात अनेक क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, ज्ञात-अज्ञात देशवासियांनी प्राणांची आहुती दिली. त्यांच्या त्यागामुळेच स्वातंत्र्याची पहाट उगवली. आज देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे होत असतानाच त्यांच्या त्यागाचे स्मरण करणे आपले सर्वांचे आद्य कर्तव्य असल्याने. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या मेरी माटी, मेरा देश या अभियानाच्या माध्यमातून 1 आक्टोम्बर रोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने सालेकसा तालुक्यातील पीपरिया जिल्हा परिषद अंतर्गत टोयागोंदी, विचारपुर, कोपालगड़, जमाकुड़ो, दरेकसा बंजारी, नवाटोला, कारुटोला, पिपरिया, रामाटोला,पाऊडदौना, रोंढा या गावात
आझादी का अमृत महोत्सव उपक्रमातर्गत अमृत कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.यात गावकऱ्याकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे.अमृत कलश यात्रेची सुरुवात दर्रेकसा येथील शिवमंदिरातुन करण्यात आले यावेळी माजी आमदार संजय पुराम, आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष व जि.प. सदस्य हनवतं वट्टी, जि.प. महिला व बालकल्याण सभापती सौ. सविता पुराम, आदिवासी आघाडीचे प्रदेश महामंत्री शंकर मडावी, भाजप कायदा आघाडीचे जिल्हा अध्यक्ष ऍड. बागडे, भाजपचे तालुका अध्यक्ष गुमानसिग उपराडे, तालुका प्रभारी परसराम फुंडे, डाँ. श्रीकांत राणा, महिला आघाडी अध्यक्ष सौ मधु अग्रवाल, आदिवासी आघाडीचे तालुका अध्यक्ष सरोज परतेती, सौ. मडावी, उपाध्यक्ष राजेंद्र बडोले, महामंत्री मनोज बोपचे, माजी नगराध्यक्ष विरेंद्र ऊईके, पंचायत समिती सदस्या अर्चना मडावी, टिकेश बोपचे, उमेदलाल जैतवार, मनोज विश्वकर्मा, तालुका पत्रकार संघांचे अध्यक्ष रमेश चुटे, चंद्रसेन मरकाम, मुकेश इनवाते, गुल्लू उपराडे, बबलू श्रीवात्री, बबलू भाटिया,मनू साखरे, घनश्याम मोहारे व मोठया संखेत नागरिक उपस्थीत होते. वरील संपूर्ण गावात अमृत कलश यात्रा काढण्यात आली याप्रसंगी घरोघरी आरती घेऊन महिला व पुरुष उपस्थित होते. यामध्ये प्रत्येक घरून 01 मूठ माती गोळा करून अमृत कलश मध्ये गोळा करण्यात आले. सदर कार्यक्रम ढोल ताशांच्या आवाजात काढण्यात आले मेरा देश मेरा घर, मेरी माती मेरा देश, माटी को नमन विरोंको वंदन, मेरी माती मेरा देश, यही है एकता का संदेश, भारत माता की जय असा जयघोष करण्यात आले.
