कोटरा येथील जि.प. शाळेला दोन पंखे भेट
साखरीटोला:- सालेकसा तालुक्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा कोटरा या शाळेला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेंद्र हत्तीमारे व शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष गुणेशर बारसे यांचे कडून 17 आक्टोम्बर रोजी प्रत्येकी एक असे दोन सिलिंग पंखे सप्रेम भेट देण्यात आले आहे. यामुळे शाळेच्या चिमुकल्या विदयार्थांना मोठी सोय होणार आहे. शाळेचे मुख्याध्यापक एच.टी.चौरागडे यांनी ही भेट स्वीकारली असून पुष्प गुच्छ देऊन दान दात्याचे स्वागत केले. यावेळी व्ही.व्ही.हत्तीमारे मॅडम, पी.के.घरडे मॅडम, बडोले सर, पशुसंवर्धन पर्यवेक्षक प्रणय फुंडे पशुसंवर्धन सहकारी राजु फुंडे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य रोशन राहुलकर यांचा उपस्थित होते. याप्रसंगी जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळा कोटरा येथील विध्यार्थी सुजल दिनेश तांडेकर वर्ग ३ रा या विध्यार्थ्याला वाढदिवसानिमित्त व्यवस्थापण समितीचे सदस्य, शिक्षक, व विध्यार्थ्यानी पुष्पगुच्छ देऊन व पेन भेट देऊन त्याचे वाढदिवस साजरे करण्यात आले.