देवरीः- ग्रामपंचायत बोरगांव येथील कलसावटोला गावात दस-याला मोठ्या प्रमाणात रावण पुजेचा आयोजन करण्यात आले.भारतात हिंदु संस्कृती मध्ये रावण ह्याला राक्षस व दोषी आहे म्हणुन दरवर्षी जाळल्या जाते.ह्या मध्ये आपण पाहीले की ही बहुजन विरोधी कथा आहे. हजारोवर्षाचा हतिहास बघितला तर ह्या देशात बहुजनातील महान राजांना मारुन त्याच्या वर साम्राज्य करण्यात आले.देशात पुर्वज लोकांना शिक्षणाचा अधिकार नव्हता त्यामुळे त्यांनी आपला इतिहास माहीत नव्हता.पण आता सांविधानिक अधिकार प्राप्त झाल्यामुळे आदीवासी शिकु लागले व त्यामधील काही लोकांनी संसोधन करुन रावण आमचा राजा होता हे सिध्द केले.त्यामुळे ते रावण पुजा करुन आपल्या समाजात जागृत करु लागले. राम व रावण हे एकाच राशिचे असतांनी युध्द का होतो.त्यामुळे तेथील वरचो बाबाजी यांनी सांगितले की आपल्या कर्मावर सर्व आधारित असते.आम्हाला मुर्ख बनवुन आमच्या वर उच्च वर्णिय लोक राज करतात. लोक एकत्रित येवुन आमच्या पुर्जजाचे काम समाजातील शिक्षित लोकांनी केले पाहीजे. कार्यक्रमाचे अध्यक्ष मणु कोराम,कार्यक्रमाचे उपाध्यक्ष डालचंद मडावी ,रविंद्र नैताम – भुमक,प्रमुख पाहुणे टि.एन.सलामे सर देवरी,लक्ष्मण मडावी,रमेश होळी व समस्त गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.