देवरीः- आज दिनांक 26/10/2023 रोज गुरुवारला ठिक 11.00 वाजे ग्रामीण रुग्णालय देवरी येथे भरपुर दिवसापासुन नविन इमारतीचे प्रस्ताव असतांनी ते काम पुर्ण झालेले नव्हते पण मागील दोन वर्षाच्या आधी हे काम चालु होवुन ते आज पुर्ण झालेले असुन त्यांचे लोकापर्ण मंत्री अन्न व औषध प्रशासन म.रा.तथा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.राजे धर्मरावबाबा आत्राम यांचे हस्ते पार पडले.लोकापर्ण सोहळ्याला उपस्थित खासदार अशोक नेतेे,माजी आमदार संजय पुराम,जिल्हाधिकारी- चिन्मय गोतमारे,जिल्ह्याचे कार्यकारी अधिकारी- अनिल पाटील,व समस्त मान्यवर उपस्थित होते. जिल्ह्याचे पालमंत्री श्री.राजे धर्मरावबाबा आत्राम यांनी ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला व्यवस्थित उपचार सुविधा झाली पाहीजे ग्रामीण रुग्णालयाच्या बाहेरील औषधी लिहुन द्यायची नाही. जनतेला खर्रा गुडखा,तंबाखु,ड्रग्स बाहेरिल राज्यातुन आपल्या राज्यात येत आहेत.आपल्या राज्यात तंबाखु युक्त पदार्थ बंद करावे अशा सुचना पोलिस विभागाला दिल्या आहेत.जनता दरबारात विविध समस्यावर चर्चा करुन संबधित अधिका-यांना जनतेचे कामे वेळेत पुर्ण करावे अशा सुचना दिल्या.त्यानंतर त्यांचे पुढील कार्यक्रमासाठी गोंदियाकडे रवाना झाले.
