देवरीः- कुनबी समाज देवरी तालुक्याच्या वतीने दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी सुध्दा कोजगिरी पोर्णिमा ही तालुक्यातील सर्व समाजबांधवाना एकत्र येवुन आपल्या समाजाच्या समस्या व आपल्या तालुक्यातील शेतकरी,विद्यार्थी यांच्या बदल सरकारचे ध्येय व धोरणे काय आहेत यांचे सखोल चर्चा सत्र ठरवुन हा कार्यक्रम आयोजित केला जातो.ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राम गायधने सर ,कार्यक्रमाचे उद्घाटक डाॅ.गजानन चुटे ,राम मते सर ,प्रमुख पाहुणे श्रीकांत चेटुले सर – एस.बी.आय.ब्रॅच मॅनेजर देवरी व चौधरी सर एच.डी.एफ.सी.बॅक मॅनेजर देवरी हे उपस्थित होते. समाजाला आज ओबीसी मधुन न्याय मिळत नाही त्यासाठी समाजाला ओबीसी काय आहे हे जाणुन घेणे महत्वाचे आहे. ओबीसी समाजाची जनगना होणे काळाची गरज आहे. त्याशिवाय आपली संख्या किती आहे हे कळत नाही तो पर्यत आपल्याला प्रत्येक क्षेत्रात प्रतिनिध्वत्व मिळणार नाही. आपण सण साजरे करु पण समाजाला सांविधानिक अधिकार मिळणे पण तेवढेच सत्य आहे असे प्रतिपादन राम गायधने सरांनी केले आहे. देवरी तालुक्यातील सर्व कुनबी बांधवानी कार्यक्रमात येवुन आनंद व्यक्त केला.कार्यक्रमाचे सुत्र संचालन गणेश मुनेश्वर सरांनी केले व आभार प्रदर्शन झंझाळ सरांनी केले.