रस्त्यावर उभ्या नादुरूस्त ट्रकला दुस-या ट्रक ची भीषण धडक, तिन लोकांचा जागेवर मृत्यू
सुरेन्द्र खोब्रागडे उपसंपादक
Elgarlivenews
देवरी:- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर शहरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या धोबीसराड गावाजवळ निष्काळजीपणे रहदारीच्या रस्त्यावर नादुरुस्त असलेल्या उभ्या ट्रकला मागुन येणा-या ट्रक ने जोरदार धडक दिल्याने नादुरुस्त ट्रकची दुरूस्ती करणा-या दोघांचा व धडक देणा-या ट्रक चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दि.31ऑक्टोबर 23 ला पहाटे 3 वाजे दरम्यान घडली.
ट्रक चालक रोशन भीमराव सोनोने(35) व वाहक प्रमोद नामदेवराव इंगळे (40) दोघे रा.टाकळी जहागिर,ता.जिल्हा अमरावती तर दुसरा चालक अनवरखान अशरफखान पठाण (26)रा.वार्ड क्रमांक 3, पो.दुसरबिड, ता.सिंदखेडराजा,जि.बुलढाणा अशी या अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.
विश्वस्त सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर धोबीसराड गावाजवळ नागपुर कडुन रायपुर कडे जाणा-या ट्रक क्रमांक एम एच 34 बी जी 5054 मध्ये बिघाड आल्याने तो निष्काळजीपणे रहदारीच्या रस्त्यावर उभा होता.
या ट्रक च्या चालकाने ट्रक मधील रिपलेक्टर किंवा दोन्ही बाजूचे इंडिकेटर चालु नसल्याने मागुन भरधाव वेगाने येणा-या ट्रक क्रमांक एम एच 16 सी डी 7716 ने जोरदार धडक दिली. यात नादुरुस्त उभ्या ट्रकची दुरूस्ती करित असलेले ट्रक चालक रोशन सोनोने व वाहक प्रमोद नामदेवराव इंगळे हे दोघे व धडक देणा-या ट्रक चे चालक अनवरखान अशरफखान पठाण यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघात एवढा भीषण होता की धडक देणा-या ट्रक चालकाला ट्रक च्या कॅबीन मधुन बाहेर काढण्यासाठी पोलीसांना अथक परिश्रम करावे लागले व शेवटी क्रेनच्या साहाय्याने ट्रकच्या कॅबीन ला तोडुनच ट्रक चालकाला बाहेर काढण्यात आले व दोन्ही ट्रकला रस्त्यावरून बाजूला करण्यात आले.
पोलीस हवालदार नरेश गायधने देवरी यांचे फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा तपास एपीआय गंगाकुचर करित आहेत.
तरि एका पंधरवाड्यात राष्ट्रीय महामार्गावर दोन अपघात झाले परंतु पोलीसांच्या तत्परतेने एल पी जी गॅस ने भरलेल्या टॅंकर पासुन लोकांचे जीव वाचले व ह्या अपघातात नाहक 3 लोकांचा बळी गेला.
त्या करिता रस्ते वाहतुक विभाग व पोलीस विभागाने ट्रक चालकाची कार्यशाळा घेवुन त्यांना वाहतुकीच्या नियमांची उजळणी करावी.
75% चालक हे फक्त 8वी ते 10,12 पास असल्याने त्यांच्यातील अपरिपक्वते मुळे असे अपघात घडतात. जर का ट्रक चे रिपलेक्टर किंवा साईड इंडिकेटर चालु असते तर ह्या तीन लोकांचे नाहक बळी गेले नसते.*
करिता रस्ता वाहतुक विभाग (आरटीओ) व पोलीस विभागाने तसे नियोजन करावे