देवरी: गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते आज सकाळी नागपूर वरून गडचिरोलीला येत असतांना वाहनाला अपघात झाला त्यात ते पूर्णतः सुरक्षित असून कुठलीही जीवित हानी झाली नाही.
काल रात्री मुंबई येथे युती पक्षाच्या खासदार व आमदारांची बैठक पार पाडून आज सकाळी ते विमानाने मुंबई वरून नागपूर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर आलेत व नागपूर वरून आपल्या खाजगी फोर्ड कंपनी च्या वाहन क्रमांक MH-33 AA – 9990 या वाहनाने गडचिरोली प्रवासा दरम्यान सकाळी १०:१५ वाजता नागपूर-उमरेड या महामार्गावर एका टिप्परने चौरस्त्याच्या ठिकाणी धडक दिली.
त्यात खासदार नेते यांच्या वाहनाला अपघात झाला.सुदैवाने अपघातात कुणीही जखमी झाला नाही. खासदार व चालक व सेक्युरिटी चे सर्व सदस्य हे सुरक्षित आहेत.
Author: Elgar Live News
Post Views: 218