आज 15 नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती पासून बेमुदत आमरण उपोषण सुरु
साखरीटोला-: (रमेश चुटे) सालेकसा तालुक्यातील नक्षल प्रभावित आदिवासी बहुल्ल वंचित क्षेत्राच्या विकासासाठी मूलभूत गरज असलेले विविध विकास कामे करण्यात यावे यासाठी पिपरिया ग्रामपंचायतचे उपसरपंच व कांग्रेस पक्षाचे वरिष्ठ कार्यकर्ता गुणाराम मेहर यांनी शासन प्रशासनासह क्षेत्राचे आमदार सहसराम कोरोटे, खासदार अशोक नेते, खासदार प्रफुल्ल पटेल, जिल्ह्याचे पालक मंत्री धर्मराव बाबा आत्राम, माजी आमदार संजय पुराम, माजी आमदार राजेंद्र जैन, सह अन्य लोकप्रतिनिधीनां निवेदन दिले होते. मात्र त्यांचे निवेदन व मागणी संदर्भात काहीच हालचाली सुरु न झाल्यामुळे आज 15 नोव्हेंबर धरती आबा बिरसा मुंडा जयंती दीनापासून पिपरिया ग्रा.प. वार्ड क्रमांक 3 नावागड येथील सार्वजनिक चावडी मधे बेमुदत आमरण उपोषण आंदोलन सुरु केले आहे. त्यांनी मागणी केलेल्या निवेदनात मौजा पिपरिया येथे प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापित करने, काशिनाला सिंचन प्रकल्पाचे अपूर्ण असलेले काम पूर्ण करने, गल्लाटोला ते पांढरी मुख्य रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करने, पिपरिया ते पांढरी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करने, चिंचटोला ते गुलाबटोला नहर मार्गाचे मजबुतीकरण डांबरीकरण करने, पिपरिया ते गोवारीटोला मार्गाचे मजबुतीकरण करने, पिपरिया ते टेभूटोला रस्त्याचे मजबुतीकरण करने, पिपरिया सिंचन प्रकल्पाचे नविनीकरण व नहराची दुरुस्ती करने, चिंचटोला ते टेभूटोला रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करने, पिपरिया, बाकलसर्रा, जांभळी मार्गाचे डांबरीकरण करने, मौजा पिपरिया अंतर्गत चिंचटोला, आलीटोला, नावागड, लोधीटोला, गुलाबटोला, हलबीटोला या प्रत्येक गावात वेगवेगळे सरकारी धान्य दुकान स्थापित करने, पिपरिया ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या सर्व जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकांची रिक्त पदे भरण्यात यावे अशी मागणी होती. पण सदर मागणीची दखल लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी घेतली नाही त्यामुळे बेमुद्दत आमरण उपोषण आंदोलन सुरु केले आहे.