देवरीः- ग्रामपंचायत ढिवरीनटोला येथे दिनांक 18/11/2023 रोज शनिवारला वैचारिक बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यात आली.आज पर्यंत बिरसा मुंडा जयंती ही गळ्यात माळ टाकुन साजरी करण्याची प्रथा होती. ढिवरीनटोला येथील सरपंचानी युवकांना एकत्रित आणुन आपण बिरसा मुंडा यांच्या कार्याची सखोल माहीती आपल्या समाजाला झाली पाहीजे यासाठी त्यांनी 15/11/2023 रोजी असलेली जयंती 18/11/2023 ला करण्याचे ठरविले. कार्यक्रमाला त्यांनी प्रबोधनकार मा.करणसिंग नागपुरे(बालाघाट एम.पी.)कार्यक्रमाचे उद्घाटक मा.गेंदलाल वर्चो,कार्यक्रमाचे अध्यक्ष -मा.दिलीप जुडा(संरपच) विशेष अतिथी- भैय्यालालजी मडावी,संजय बाेहरे,कृष्णा ब्राम्हणकर,भुरे मॅडम,राजेश मडावी, मेघनाथ भेंडारकर,जीवन तावाडे अनिल मडावी,रमेश मडावी,सुषमा वैद्य,सौ.सुनिता पुराम,सौ.होमिनबाई जुळा,सौ.भागनबाई मडावी कार्यक्रमाला उपस्थिती होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कैलाश वैद्य यांनी केले व आभार प्रदर्शन दिनेश वेैद्य यांनी केले.
