26/11 हल्ल्यातील हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी महारक्तदान शिबिर
साखरीटोला:- रमेश चुटे)
पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या मुंबईवरील नापाक हल्ल्यात शहीद झालेल्या पाेलिस आणि जवानांसह विविध घटनांत शेकडाे देशवासीयांना आदरांजली वाहण्यासाठी प्रतिमांना केवळ फुले किंवा पुष्पहार अर्पण करण्याऐवजी आपल्याच रक्ताचेदान करून आदरांजली वाहण्यासाठी गोंदिया जिल्हा पोलीस दल व एचडीएफसी बँक गोंदियाच्या संयुक्त विधमानाने 26 नोव्हेंबर 2023 रोज रविवारला पोलीस स्टेशन सालेकसा येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान रक्तदान करणाऱ्याना एक वर्ष कालावधीचे डोनर कार्ड, फळ स्वीट, ट्रेव्हल बॅग, व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. हे रक्तदान देशाच्या रक्षणार्थ शहीद झालेल्या पाेलिस जवानांबराेबरच सामान्य नागरिकांच्या बलिदानाला ही श्रद्धांजली असेल. रक्तदानामुळे रक्त घेणाऱ्याचा जीव वाचताेच, शिवाय रक्तदात्याच्या शरीरातही शुद्ध रक्त निर्माण हाेत असल्याने त्याचाही फायदा हाेत असताे. असा हा दुहेरी लाभ असल्याने रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे शिबिरात भाग घेऊन रक्तदान करावे असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
![Elgar Live News](https://secure.gravatar.com/avatar/74fb4f4b083185b668967fec198f3e1b?s=96&r=g&d=https://elgarlivenews.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)