साकरीटोलाः- साकरीटोला (गोंदिया ) येथे दिनांक २६ नोव्हे २०२३ रोज रविवारला संविधान दिवसानिमित्त बहुजन एकता मंचाव्दारे लोकांना त्याच्या अधिकाराबाबद माहीती व्हावी त्यांना आमचे अधिकार काय आहेत आमच्या अधिकाराचे आम्हाला देशात स्थान आहे किंवा नाही यांची जाणिव करण्यासाठी विविध इतिहासकार मान्यवरांना मार्गदर्शक म्हणुन कार्यक्रमाला बोलवल्या जाते. बहुजन लोकांचे अधिकार संपवुन त्यांना गुलाम करण्याच्या कार्यक्रमाला बहुजन मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.आम्ही कुणाचे गुलाम आहोत यांची माहीती देणा-या कार्यक्रमाला बहुजन गैरहजेरी लावतात म्हणुन संविधान ग्रंथ बहुजनाच्या घरात नाही ही शोकांतिका आहे. बहुजन लोकांनी संविधान वाचन करण्याची गरज आहे.संविधानामुळे गोरगरीब व अती मागस जातीना प्रतिनिधित्व मिळाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.सुधाभाऊ शिवणकर, प्रमुख पाहुणे – युगराज कोरे,गोसावी आसोले, ऱुपाली उके ,अनंतरामजी कोरे,पुरणजी मटाले,सुनंदाताई बहेकार,डॉं.भुवन मेंढे, मार्गदर्शक मा.डी.एस.मेश्राम(गोंदिया) मा.करणसिंह नागपुरे(युवा समाज जागृती नेता) ,गुरुदास येडेवार (ओबीसी जनजागृती मार्गदर्शक)यांनी मार्गदर्शक केले. बहुजन एकता मंचाच्या सदस्यांनी कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी भरपुर मेहनत घेतली. कार्यक्रमाची प्रस्तावना संजय बोहरे व सुत्रसंचालन कैलाश वैद्य यांनी केले व आभार प्रदर्शन रोशन मरस्कोल्हे यांनी केले.