देवरीः- (०२/१२/२०२३) अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग नागपुर अंतर्गत शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील विद्यार्थ्याचा क्रिडा स्पर्धा राबविण्यात येत आहे. नागपुर विभागातील नागपुर,अहेरी,भंडारा,गडचिरोली,भामरागड,चिमुर,चंद्रपुर देवरी,वर्धा यांचा समावेश देवरी येथील जिल्हा परिषद ग्राउंडवर क्रिडा स्पर्धा सुरु होत आहे.या कार्यक्रमाचा उदघाटन सोहळा आज साय.६ वाजे पार पडला कार्यक्रमाचे अध्यक्ष- सहेषराम कोरोटे (आमगांव विधान सभा क्षेत्राचे आमदार) कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे – मनोहर चंद्रिकापुरे (मोरगाव/अर्जुनी क्षेत्राचे आमदार) कार्यक्रमाचे उदघाटक- अनिल पाटील (मुख्य कार्यकारी अधिकारी गोंदिया)संजु उईके -नगराध्यक्ष नगरपंचायत देवरी.संजय पुराम – माजी आमदार, संदिप भाटिया (जिल्हा परिषद भर्रेगाव क्षेत्र) शंकर मडावी साहेब,अंजनकर साहेब(भाजपा गोंदिया -भंडारा महामंत्री)बबलु कुरेशी -नगरसेवक नगरपंचायत देवरी,अनिल येरणे – जिल्हा महामंत्री, प्रविण दहिकर(भाजपा तालुका अध्यक्ष) तुमरेकी साहेब,रामटेेके-अनु जाती ,अनु जमाती समाजकल्याण कार्यालय गोंदिया, नामदेव आचले -सामाजिक कार्यकर्ता,दसरथ कुरमाके उपायुक्त,सर्व विभागाचे प्रकल्प अधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते.कार्यक्रमाला संबोधित करतांनी मनोहर चंद्रिकापुरे (मोरगाव/अर्जुनी क्षेत्राचे आमदार) यांनी आदीवासी समाजाने खेळण्यापर्यंत मर्यादित न राहता त्यांनी ज्या ठिकाणी कायदे बनतात त्याठिकाणी शुुध्दा जाण्याची गरज आहे.आजादी अमृत महोत्सव ७५ वा साजरा करतो पण आदीवासी समाजाच्या सांविधानिक पदावर आजपर्यंत आदीवासी समाज पोहचला नाही.त्यासाठी उपाययोजना होणे आवश्यक आहे.विद्यार्थी मित्रानो आपण पतंगासारखी भरारी मारुन देशात नाही तर विदेशात भरारी मारण्याचे स्वप्न बघुन त्याच्यासाठी मेहनत करा.डॉ.बाबासाहेब म्हणतात की १ रुपया कमवत असाल तर ५० पैसे पुस्तक घेण्यासाठी खर्च करा व ५० पैसे खाण्यासाठी खर्च करा.असे संबोधन केले. ह्या ठिकाणी देवरी तालुक्यातील समस्त नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री-झाडे सर साह्यक प्रकल्प नागपुर,अनिल सोमणकर साह्यक प्रकल्प गडचिरोली,दुर्गा लांजेवार – शिक्षिका शासकीय आश्रम शाळा पुराडा,कार्यक्रमाचे आभार प्रर्दशन निरज मोरे प्रकल्प अधिकारी भंडारा यांनी केले.