सालेकसाः-(सुरेन्द्र खोब्रागडे उपसंपादक, Elgarlivenews) पानगांव परिसरातील लोकांनी केला चक्काजाम भरधाव वेगात असलेल्या क्रेनने जोरात धडक दिल्याने गुपचूप विक्रेत्याचा जागीच मृत्यू झाला.
आमगांव राज्य मार्गावर शनिवारी (दि.2/12/23) ला दुपारी 1:30 वाजता दरम्यानची घटना जागेश्वर विठोबा उईके (33,रा कुणबीटोला) असे मृताचे नाव आहे.जागेश्वर उईके हा तरूण बेरोजगारी वर मात करून कुणबीटोला येथून पायपीट करून दररोज गुपचूप चा ठेला घेवुन गावागावात जाऊन आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा परंतु काल दुपारी 1:30 वाजताच्या दरम्यान आमगांव वरून सालेकसा कडे जाणा-या क्रेन क्रमांक एम एच 49 बी डब्ल्यू 7124 ने त्याला जोरात धडक दिली धडक इतकी जबर होती की मृतकाचा चेंदामेंदाच होऊन जागेवर त्याचा मृत्यू झाला व कुटुंबाचा आधारच गेला.या धडकेची माहिती लगेच गावक-यांना झाल्याने लोक मौक्यावर जमु लागले त्याची माहिती पोलीस ठाणे व रूग्नवाहीकेला देण्यात आली माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे व कर्मचारी अपघातस्थळी पोहोचले.परंतु तेव्हा पर्यंत मृतकाच्या कुटुंबाचे व परिसरातील लोकांनी अपघात स्थळावर येवून चक्काजाम आंदोलन केले व मृतकाचे कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणी केली अन्यथा शव न उचलण्याचा इशारा दिल्याने चक्काजाम आंदोलन तीन तास राहिला त्यामुळे दोन्ही बाजुला वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या व वातावरण चिघळण्याची शक्यता बघुन पोलीसांनी अतिरिक्त कुमक मागवून लोकांना शांत करून आंदोलन संपविले.परंतु अजुनही आर्थिक मदत मिळाली नसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
