गोंदियाः- दि.०४-१२-२०२३ ला गोंदिया येथील संपुर्ण विधान सभा सदस्य यांच्या निवास स्थानासमोर महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटनने विधानसभा सदस्य यांना आपल्या मागण्या माहीती व्हाव्यात व आमचे प्रश्न विधानसभेत मांडण्यासाठी एकदिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले.प्रत्येक विधानसभा सदस्य यांनी पाठिंबा देवुन तारांकित प्रश्न ठेवण्याचे आश्वासन देले आहे. १) ग्रामपंचायत संगणक परिचालकांना सुधारित आकृतीबंधानुसार कर्मचारी दर्जा देऊन किमान वेतन मिळण्याबाबत. २) आकृतीबंध ही किचकट प्रक्रिया असुन ती पुर्ण होईस्तोवर संगणक परीचालकांना तात्पुरती मानधन वाढ करुन किमान २२००० मानधन मिळण्याबाबद. त्यावेळी संघटनेचे अध्यक्ष/उपाध्यक्ष तसेच सर्व पदाधिकारी व संगणक परिचालक गोंदिया उपस्थित होते.
![Elgar Live News](https://secure.gravatar.com/avatar/74fb4f4b083185b668967fec198f3e1b?s=96&r=g&d=https://elgarlivenews.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)