साखरीटोला- (रमेश चुटे)
पूर्ती बहुउद्देशीय संस्था सालेकसा द्वारा संचालित एसआरबी महिला महाविद्यालय सालेकसा संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय राजेंद्रजी बडोले सर सचिव पूर्ती बहुउद्देशीय संस्था सालेकसा, प्रमुख अतिथी म्हणून शालिनीताई साखरे अध्यक्षा पूर्ती बहुउद्देशीय संस्था सालेकसा, भूषण राऊत प्राचार्य पूर्ती पब्लिक स्कूल सालेकसा, आकाश डोंगरवार विभाग प्रमुख एसआरबी महिला महाविद्यालय सालेकसा, लोकेश चन्ने प्राचार्य पूर्ती पब्लिक कनिष्ठ महाविद्यालय सालेकसा, प्राध्यापिका एस. सी. बीसेन एसआरबी महिला महाविद्यालय सालेकसा, प्राध्यापिका एस. सी. गंगभोज, एसआरबी महिला महाविद्यालय सालेकसा प्रामुख्याने उपस्थित होते. सर्वप्रथम विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलित करून माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांनींनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. विद्यार्थ्यांनी गीतांमधून, भाषणांमधून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिली. अध्यक्षीय भाषणात राजेंद्र बडोले सर यांनी डॉ.बाबासाहेब यांचा भारतीय समाजाच्या निर्मितीतील महत्व विषद केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच तळागळातील लोकांना जगण्याचे बळ मिळाले या शब्दात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिली. कार्यक्रमाची यशस्वीतेसाठी प्रा. जांभुळकर, प्रा धकाते मॅडम, संबोधीनी राऊत, अमित कोटांगले, ईशांत लोथे, नेताजी तुमसरे, साहिल परिहार, शैलेश सोनकनवरे, ज्ञानदास नागपुरे, गावराने ताई यांनी परिश्रम घेतले.