आमगांवः- (दि.२२/१२/२०२३ रोज शुक्रवारला) आमगांव तालुक्यातील तहसिल कार्यालयामध्ये जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते.जनता दरबार हे २ वाजे सुरु झाले मान्यवरांचे स्वागत करुन जनतेला त्याच्या समस्याबाबद अर्ज मागविण्यात आले त्यांच्या अर्जाची पाहणी मा.ना.श्री.धर्मरावबाबा आत्राम यांनी केली व संबधित अधिका-यांना तात्काळ त्यांच्या समस्या सोडवुन त्यांना न्याय देण्यात यावे असे निर्देश देण्यात आले. जनता दरबारात वनह्क्काचे पट्टे वाटप करण्यात आले.ओबीसी घरकुल तात्काळ मंजुर करुन त्यांना देण्यात यावे असे निर्देश देण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.ना.श्री.धर्मरावबाबा आत्राम ( मंत्री,अन्न व औषध प्रशासन,महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री गोंदिया जिल्हा ) हे होते.प्रमुख पाहुणे – राजेंद्र जैन(माजी आमदार ) उपस्थित होते.
Author: Elgar Live News
Post Views: 112