साखरीटोला/ सालेकसा (रमेश चुटे)
निष्काम कर्मयोगी समर्पित भावनेने जीवन जगणारे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना जयंती निमित्य साखरीटोला भाजपच्या वतीने अभिवादन करण्यात आले. प्रत्यक्ष कृतीतून व आचारणातून साकारणारे सर्वात्तम उदाहरण म्हणजे श्रद्धेय अटलजी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत बैलगाडीने प्रवास करून जनसंघाचा दिवा प्रत्येक गावात पोहचविला. पक्ष कार्यासाठी अतिशय परिश्रमाने गितेच्या संदेशाने संपुर्ण जीवन समर्पित भावनेने जगले. त्यांचा आदर्श नवीन पिढीने घ्यावा असे विचार साखरीटोला ता. सालेकसा येथे अभिवादन कार्यक्रमात व्यक्त्यांनी व्यक्त केले. आज दि. 25 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन साखरीटोला येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले होेते. प्रारंभी अटलजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजप व्यापार आघाडीचे महामंत्री सुनील अग्रवाल, तालुका मराठी पत्रकार संघांचे अध्यक्ष रमेश चुटे, भाजप युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष देवराम चुटे, वरिष्ठ पदाधिकारी रेखालाल गौतम, विजय येडमे, युवा मोर्चाचे प्रमोद कोरे, वार्ड प्रमुख प्रेमलाल दोनोंडे, टीनाताई चुटे विशाल चकोले, रुपेश बघेले, दुलीचंद येटरे, आनंद कलचार, जितेंद्र पटले, राहुल चकोले, लक्षमन हरीणखेडे इत्यादी भाजप कार्यकर्ता प्रामुख्याने उपस्थित होते.
