सालेकसा तालुक्यातील वाहन चालक-मालक संपावर

????नवीन मोटार वाहन कायद्याला विरोध…
????पंप बंद राहण्याच्या भीतीपोटी पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी वाहनधारकांच्या पंपांवर रांगा

साखरीटोला:- (रमेश चुटे) केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटार वाहन कायद्यानुसार यापुढे अपघातास जबाबदार ट्रकचालकास दहा वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. सोबतच सात लाख रुपये दंड देखील आकाराला जाणार आहे. दरम्यान याच कायद्याला देशभरात विरोध होत असून सालेकसा तालुक्यातील वाहन चालक मालक संघटनानी थेट संपाची हाक दिली आहे. हा नवीन कायदा रद्द करा अशी मागणी करत 1 जानेवारी रोजी सालेकसाचे तहसीलदार कोंडागुर्ले यांच्या मार्फत मा. पंतप्रधान व भारताचे गृहमंत्री यांना निवेदन देऊन तीन दिवसाचा संप पुकारला आहे. ज्यात 1 ते 3 जानेवारीदरम्यान चालक-मालक संपावर राहणार आहेत निवेदनात संघटनेचे अध्यक्ष सुरेश कुंभरे यांनी सांगितले की कोणताही वाहन चालक स्वतःहुन अपघात करत नाही तर रस्त्यात दिसणारे कुत्रे, मांजर, आदी पशु पक्षीनां सुद्धा वाचविण्याचा प्रयत्न करीत असतात. चूक कोणाची पण असो अपघात झाल्यास चालकाचे प्रयत्न असते की अपघातग्रस्त व्यक्तिला रुग्णालयात न्यावे पण घटनास्थळी जमलेल्या गर्दीकडून होत असलेली शिवीगाळ, मारहान, जाळपोळ, असे कृत्य होत असल्यामुळे चालक मुद्दाम आपला जीव वाचवीण्यासाठी पळ काढतात हे उल्लेखनीय आहे. करिता शासनाने सदर निर्णय तत्काळ प्रभावाने मागे घ्यावे असे निवेदनात नमूद आहे. संप दरम्यान तालुक्यातील सर्व चार-चाकी, आटोरिक्षा, मालवाहक, जडवाहने, शाळेच्या बसेस बंद राहणार आहेत.

बंद ला तालुका कांग्रेस कमेटी व बहुजन समाज पार्टीचे समर्थन????

पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी पंपांवर रांगा

पेट्रोल-डिझेल पुरवठा करणाऱ्या टँकरचालकांनी तीन दिवसीय संप पुकारला असल्याच्या बातम्या कालपासून माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. त्यामुळे पंप बंद राहण्याच्या भीतीपोटी वाहनधारक पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी पंपांवर रांगा लावत असल्याचे पाहायला मिळत आहे.

असा आहे नवीन कायदा

नवीन मोटार वाहन कायद्यानुसार ट्रकमुळे एखादा व्यक्ती जखमी झाल्यास त्याला तात्काळ रुग्णालयात नेले पाहिजे, तसे न केल्यास आणि ट्रकचालक दोषी आढळून आल्यास त्याला सात वर्षांची शिक्षा आणि सात लाख रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. भारतात 28 लाखांहून अधिक ट्रक चालक 100 अब्ज किलोमीटरचे अंतर कापतात. या ट्रकवर 50 लाखांहून अधिक लोकं काम करतात. अशा परिस्थितीत ट्रकमुळे होणारे रस्ते अपघातही घडत आहेत. मात्र अपघात झाल्यानंतर ट्रक चालक ट्रक थांबवणे तर दूर चालक मागे फिरून सुद्धा पाहत नाही. त्यामुळेच सरकारने नवीन कायदा आणला असल्याचे बोलले जात आहे.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: सालेकसा तालुक्यातील वाहन चालक-मालक संपावर, ID: 29348

Ad: MM LIGHTTING (2543)





Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर