????बैरि. राजाभाऊ कनिष्ठ महाविद्यालय साखरीटोला येथे मराठी पत्रकार दिन उत्साहात
साखरीटोला-: स्वातंत्र्याचा लढा सुरु असतांनाचें काळात अन्य कोणते ही माध्यमे नसताना जनजागृती आणि जनतेचें विविध प्रश्न समस्यांना वाचा फोडून समाज प्रबोधनाचे काम वर्तमानपत्रानीं केले. म्हणून लोकशाही समाज व्यवस्थेतील चार स्तंभापैकी पत्रकारितेला चौथे आधार स्तंभ संबोधले जाते असे मत सालेकसा तालुका मराठी पत्रकार संघांचे अध्यक्ष रमेश चुटे यांनी 6 जाने. रोजी बेरीस्टर राजाभाऊ कनिष्ठ महाविद्यालय साखरीटोला येथे मराठी पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलतांना व्यक्त केले.
वृत्तपत्र वाचणे हा बहुतांश जणांचा एक छंदच आहे. सकाळी वृत्तमानपत्रे वाचले नाही तर चहा आणि नात्यांचे चव सुद्धा येत नाही. वर्तमानपत्राच्या माध्यमाने जगभरातील घडामोडी बातम्यांची माहिती मिळते. महत्वाच्या घटना व त्यामागील कारणे व त्यांचे परिणाम कळून येतात. वैद्यकीय अविष्कार, नवनवीन शोध, अपघात, राष्ट्रा राष्ट्राचे परस्परातील संबंध आणि ताण तणाव, दंगली, संप, गुन्हे आणि मनोरंजन याविषयी वर्तमान जगात चाललेल्या हालचालीं कळतात असे मत राकापा ओबीसी आघाडीचें प्रदेश सरचिटणीस प्रभाकर दोनोंडे यांनी व्यक्त केले. आजच्या घडीला कोनाकोपऱ्यातील माहिती मिळवण्यासाठी इलेक्ट्रानिक्स चॅनल, रेडिओ, वॉट्सअप, फेसबुक, युट्युब, पोर्टल, यांसारखी विविध साधने उपलब्ध असले तरी आधुनिक माध्यमांच्या युगातही वर्तमान पत्राचे स्थान अग्रगण्य आहे असे मत तालुका मराठी पत्रकार संघांचे सचिव प्राचार्य सागर काटेखाये यांनी व्यक्त केले ते कार्यक्रमाचें म्हणून बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात मराठी पत्रकार सृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन व पुष्पहार अर्पित करून करण्यात आले. मराठी पत्रकार दिनानिमित्त बैरी. राजाभाऊ कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमाची अध्यक्षता पत्रकार संघांचे सचिव प्राचार्य सागर काटेखाये यांनी केले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून तालुका मराठी पत्रकार संघांचे अध्यक्ष रमेश चुटे, राकापा ओबीसी आघाडीचें प्रदेश सचिव प्रभाकर दोनोंडे, प्रा. गणेश भदाडे, वैधकीय अधिकारी डाँ. कु. स्नेहल ठाकरे, पत्रकार संतोष अग्रवाल, विशाल चकोले, प्रा. बावनथडे, रवी पडोळे, उपस्थित होते. कार्यक्रमाचें प्रास्ताविक वाचन पत्रकार प्रा. गणेश भदाडे यांनी केले, संचालन कु. निराली चुटे यांनी तर आभार प्रा. भदाडे यांनी मानले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयीन विध्यार्थिनी कु. आदिती भांडारकर, अपर्णा नेवारे, विद्या दोनोंडे, कु. मतारे, आदित्य चित्रीव, अमन कुंभलवार यांनी परिश्रम घेतले.
