साखरीटोला-: सालेकसा तालुक्यातील साखरीटोला येथे अयोध्या येथील राममंदिर उदघाटन व प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अक्षता वितरण निमंत्रण कार्यक्रमाला स्वयंस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी २०२४ रोजी होत असून. यानिमित्त श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यास अयोध्यातर्फे साखरीटोला येथे अभिमंत्रित अक्षता कलश पोहोचले होते. दरम्यान 13 जानेवारीला ढोलतासाच्या गजरात घरोघरी जाऊन अक्षदा वितरण व निमंत्रण अभियान राबविण्यात आले. पहिल्याच दिवसी धर्मप्रेमी गावकऱ्याकडून कलश धारक महिलाचें पाय धुवून ओवाळणी करून कलशाचें पूजन व आरती करून जागोजागी स्वागत करण्यात आले. सर्वाना अयोध्याला जाने शक्य होणार नाही यासाठी 22 जानेवारी रोजी साखरीटोला येथील हनुमान मंदिरात अभिषेक, पूजन, आरती, महाप्रसाद व हनुमान चालीसा पाठ, शोभायात्रा कार्यक्रम आयोजित असून सर्व नागरिकांनीं आरती व पाच दिवे सोबत घेऊन यावे आणि आपआपल्या घरी सुद्धा दिवे लाऊन उत्साहात दिवाळी सारखा आनंदोत्सव साजरा करावा या निमित्ताने संपूर्ण देश पुन्हा राममय व्हावा, असे निमंत्रण देण्यात आले. शुभकार्याचे निमंत्रण देण्याच्या परंपरेप्रमाणे अक्षदा, सोबत निमंत्रण, मंदिराच्या माहितीचे आणि मंदिराच्या प्रतिमेचा फोटो देण्यात आले. अक्षता वितरण निमंत्रण कार्यक्रमात सुनील अग्रवाल, रमेश चुटे, पुर्थ्वीराज शिवणकर, आशिष अग्रवाल, शामलाल दोनोंडे, रामदास हत्तीमारे, बबलू कटकवार, संजय मिश्रा, प्रेम दोनोंडे, विशाल चकोले, अंकित मिश्रा, सुनील पंजवानी, ईश्वर फुडे, चैतन्य देवकाते, सौ. मायाताई ऋषींकुमार चुटे, स्वेता मनोज अग्रवाल, मंजुषा मेंढे, उर्मिला दोनोंडे, वैशाली मेंढे, अर्चना मडावी, वर्षां आशीष अग्रवाल, सैफाली संदीप अग्रवाल, मेघा पवन अग्रवाल शुभांगी अनीश अग्रवाल, प्रतिभा बबलू मेंढे, मधु कांतिलाल अग्रवाल, सुनीता प्रल्हाद मेंढे, सपना सौरभ अग्रवाल, गीता राजेश बागडे, उमा सुनील अग्रवाल, उषा नरेश अग्रवाल, अन्यया आशीष अग्रवाल यांचा समावेश होता.