????पिपरिया क्षेत्रात वर्तमान आमदारांला झटका, कॉंग्रेसला खिंडार…
साखरीटोला– (रमेश चुटे) सालेकसा तालुक्यातील पिपरिया ग्रामपंचायतचें उपसरपंच व वर्तमान आमदार सहसराम कोरोटे यांचे खंदे समर्थक कॉंग्रेस नेते व पत्रकार गुणाराम मेहर यांनी 14 जानेवारी रोजी कांग्रेसला रामराम ठोकून भाजपचें नेते व माजी आमदार संजय पुराम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून असंख्य कार्यकर्त्यांसह माजी आ. पुराम यांचे निवास स्थळी पुराडा येथे येऊन भाजप मधे प्रवेश घेतला आहे. गुणाराम मेहर यांच्या भाजप प्रवेशाने विद्यमान आमदार कोरोटे यांना मोठा झटका बसणार आहे. पुराम यांनी पक्षाचा दुपट्टा व पुष्पगुच्छ देऊन गुणाराम मेहेर, रामलाल भोयर, भारत भुरकुडे, प्रभूदयाल वडगाये, धनराज भोयर, गोविंदा जगदाड, डाँ. मनोज कोरोटे, यांचा भारतीय जनता पक्षात स्वागत केले. गुणाराम मेहर हे कांग्रेसचे कर्तव्यनिष्ठ व जमिनी कार्यकर्ता होते. त्याच्या भाजप प्रवेशामुळे कॉंग्रेसला मोठे खिंडार पडले असून याचा परिणाम आगामी निवडणुकीत बघायला मिळेल अश्या चर्चाना ऊत आले आहे. भाजप प्रवेशानंतर मेहर यांनी सांगितले कि पुराम यांची कार्यशैली व विकासाप्रति आत्मीयता बघुन मी जनसेवेसाठी भाजप मध्ये प्रवेश करत असल्याचे स्पष्ट केले. गुणाराम मेहर व त्याचा सहकार्याचा भाजप प्रवेश झाल्यामुळे आमगाव/देवरी विधानसभा क्षेत्रात निश्चितच भाजपची शक्ती वाढणार आहे. यामुळे माजी आमदार संजय पुराम यांच्या कुशल नेतृत्वाची सर्वत्र चर्चा होत आहे. यावेळी भाजप पिपरियाचें रामलाल डिब्बे, भाजप आदिवासी आघाडीचें तालुका अध्यक्ष सरोज परतेती, धिरेंद्र अग्रवाल, सेवकदास दशरीया, साहेबदास लिल्हारे, दानेश्वर नवगोडे, कवलंचंद दसरीया, महिला आघाडीच्या अध्यक्ष सौ. मधू अग्रवाल उपस्थित होते.
