एकल विद्यालयाचें पुढाकार, महिलांचा स्वयंस्फूर्त प्रतिसाद
साखरीटोला-: सालेकसा तालुक्यातील सलंगटोला येथील एकल विद्यालयातील विध्यार्थ्यानी भव्य कलश यात्रा काढून, भजन पार्टीसह अयोध्या येथील श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या अक्षता वितरण करून निमंत्रण दिले आहे. सदर अक्षता वितरण कार्यक्रमात महिलाची मोठी भागीदारी होती. 22 रोजी श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असून. यानिमित्त एकल विद्यालयात अक्षता कलश पोहोचले होते. दरम्यान 14 रोजी भव्य कलश यात्रा भजन पार्टीच्या गजरात घरोघरी जाऊन अक्षदा वितरण करण्यात आले. सलंगटोला येथील धर्मप्रेमी नागरिकांनी कलशाचें पूजन करून जागोजागी स्वागत करण्यात आले. सर्वप्रथम हनुमान मंदिर व परिसराची स्वच्छता व पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आले. यावेळी सलंगटोला येथील एकल विद्यालयाच्या आचार्य सौ. हेमलताताई दोनोंडे, एकल विद्यालय तिरखेडी संच ता. सालेकसा ग्राम विकास समितीचें अध्यक्ष रमेश चुटे, हणवंतजी मुनेश्वर, प्रदीप चुटे व विध्यार्थ्यांचें पालक मोठया संख्येने उपस्थित होते. सर्वाना अयोध्याला जाने शक्य होणार नाही यासाठी 22 जानेवारी रोजी स्थानिक हनुमान मंदिरात पूजापाठ रात्रीला मंदिर तसेच आपआपल्या घरी दिवे लाऊन दिवाळी सारखा आनंदोत्सव साजरा करावा अशी विनंती करण्यात आले. याप्रसंगी महिलाची उपस्थिती उल्लेखनीय होती.
![Elgar Live News](https://secure.gravatar.com/avatar/74fb4f4b083185b668967fec198f3e1b?s=96&r=g&d=https://elgarlivenews.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)