साखरीटोला-: सालेकसा तालुक्यातील साखरीटोला येथे अयोध्या येथील श्रीराममंदिर उदघाटन व प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या अक्षता ढोल तासाच्या गजरात वितरीत करून निमंत्रण देण्यात आले. अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी २०२४ रोजी होत असून. यानिमित्त घराघरात निमंत्रण देण्यासाठी आलेल्या अक्षता 14 रोजी ढोलतासाच्या गजरात घरोघरी जाऊन वितरण करून निमंत्रण देण्यात आले. याप्रसंगी अक्षता कळशाचे जागोजागी स्वागत करण्यात आले. सर्वाना अयोध्याला जाने शक्य होणार नाही यासाठी 22 जानेवारी रोजी साखरीटोला येथील हनुमान मंदिरात अभिषेक, पूजन, आरती, महाप्रसाद व हनुमान चालीसा पाठ, शोभायात्रा कार्यक्रम आयोजित असून सर्व नागरिकांनीं आरती व पाच दिवे सोबत घेऊन यावे आणि आपआपल्या घरी सुद्धा दिवे लाऊन दिवाळी सारखा आनंदोत्सव साजरा करावा अशी विनंती करण्यात आले. अक्षदा, सोबत मंदिराच्या प्रतिमेचा फोटो देण्यात आले. दुसऱ्या दिवशीच्या अक्षता वितरण कार्यक्रमात सालेकसा वरून आलेल्या सौ. मधू अग्रवाल, सुनील अग्रवाल, रमेश चुटे, प्रभाकर दोनोंडे, पुर्थ्वीराज शिवणकर, रामदास हत्तीमारे, बबलू कटकवार, संतोष अग्रवाल, प्रदीप अग्रवाल, विशाल चकोले, देवराम चुटे, संजय गौतम, धिरेंद्र अग्रवाल, एस. नरेश अग्रवाल यांचा समावेश होता.
