सालेकसा येथे कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापित करा

????शिवसेना शिंदे गटाचें सालेकसा तहसीलदाराला निवेदन
????जिल्ह्यात फक्त सालेकसा तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती पासून वंचित
साखरीटोला-: (रमेश चुटे)
सन 2013 यावर्षी सालेकसा येथे मंजूर झालेली कृषी उत्पन्न बाजार समिती (स्वतंत्र बाजार पेठ) तात्काळ स्थापित करा या मागणीला घेऊन सालेकसा शिवसेना तर्फे गोंदिया जिल्हा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र नायडू, डॉ. हिरालाल साठवणे, अर्जूनसिहं बैस, तालुका प्रमुख विजय नागपुरे, शहर प्रमुख राहुल देव साठवणे, यांच्या नेतृत्वाखाली भव्य रैली काढून सालेकसाचें तहसीलदार नरसय्या कोंडागुर्ले यांच्या मार्फत राज्याचें मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले. सालेकसा येथे कृषी उत्पन्न बाजार समिती (स्वतंत्र बाजार पेठ) तात्काळ प्रभावाने सुरु करण्यात यावे. गोंदिया जिल्ह्यातील आठ तालुक्यापैकी सात तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापित असून फक्त सालेकसा तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती पासून वंचित आहे. सालेकसा तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची बाजार पेठ उपलब्ध नसल्याने शेतीमध्ये होणारे उत्पन्न धान्य, कडधान्य, भाजीपाला, व अन्य उत्पादनाला योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी दिवसोदिवस आर्थिक दृष्ट्या कमकुवत होत चालले आहेत. त्याचा दुष्परिणाम शेतकऱ्यांच्या पीक उत्पादनावर होऊ लागला आहे. करिता सन 2013 मधे मंजूर झालेली सालेकसा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती कोणत्याही बाजार समितीला न जोडता सालेकसा येथे स्वतंत्र बाजार पेठ उपलब्ध करून देण्यात यावे या मागणीसाठी 16 जानेवारी रोजी सालेकसा तालुका शिवसेना शिंदे गटाच्या वतीने भव्य रैली काढून तहसीलदाराला निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेना (शिंदे गट) जिल्हा प्रमुख सुरेंद्र नायडू, तालुका प्रमुख विजय नागपुरे, शहर प्रमुख राहुल देव साठवणे, आमगाव तालुका प्रमुख अनिल सोनकणवरे, कगेश राव, महिला जिल्हा प्रमुख मायाताई शिवणकर, आमगाव महिला तालुका प्रमुख वनिता ब्राह्मणकर, हेमराज लील्हारे, किसनलाल रहांगडाले, घनश्यामभाऊ बहेकार, अर्जूनसिग बैस, संजू दरेकर आमगाव, दुर्गाप्रसाद लिल्हारे, श्रीराम लिल्हारे, हिवराज येळे, पंचशीलाताई वैद्य, नरेश नागपुरे, घनश्याम नागपुरे, गुड्डू थेर, दिनेश हटीले, शिवचरण लिल्हारे, चुन्नीलाल बिसेन, योगराज चींधालोरे, चंदन चींधलोरे, चायेंद्र चिंधालोरे व मोठया संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: सालेकसा येथे कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापित करा, ID: 29408

Ad: MM LIGHTTING (2543)





Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर