नागपुरः- नागपुर जिल्ह्यातील गेल्या ८ वर्षापासून कोच्छी बॅरेज खापा ता. सावनेर जि. नागपूर येथे वरिष्ठ लिपिक पदावर सतत कार्यरत असलेले सुनील मैद यांचे बदली प्रकरणात कार्यवाही करण्यास टाळाटाळ व प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करून शासनाची दिशाभूल करणारे संबंधित पाटबंधारे सिंचन विभागाचे दोषी अधिकारी व कर्मचारी यांना त्वरित निलंबित करण्याची मागणीचे लेखी निवेदन जनकल्याण समाजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीतर्फे समितीचे विदर्भ महासचिव महेंद्र सातपुते यांचे नेतृत्वात शिष्टमंडळाद्वारे सिंचन भवन कार्यालय नागपूर येथील मुख्य अभियंता पवार यांना नुकतेच देण्यात आले तसेच कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी निवेदन देताना शिष्टमंडळात समितीचे विदर्भ महासचिव महेंद्र सातपुते, जिल्हाध्यक्ष राजेंद्र नवघरे , सुभाष पानघाटे ,निलेश झाडे ,जीवन बागडे ,विलास रंगारी प्रामुख्याने उपस्थित होते.
